text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

स्वतःची सापडत नाही पण दुसऱ्याची लगेच दिसते ती...

    चुका शोधन सोपं असतं पण त्याच चुका ओळखून दुरुस्त करणं अवघड. दैनंदिन जीवनात आपल्याला घरात, कामात, आजूबाजूला दिसत असेलच. अनेक लोक हे फक्त चुका शोधत असतात. पण त्या कशा सुधारायच्या हे सांगत नाही. एखाद्या कडून चूक झालीच तर त्याला त्या चुके वरून सुनवणार, चार लोकांसमोर बोलून दाखवणार पण आपल्या हातून काही करणार नाही. अशी अनेक लोकं पहायला मिळतात. आणि हातांच्या बोटावर मोजता येतील अशी लोकं स्वतःच्या हाताने चूक सुधारणार आणि चुकी झाली त्याच कारण शोधतील आणि पुन्हा चूक होऊनये यासाठी आपल्या परीने काही करता येत असेल तर ते करतील.



चुका शोधन सोफ असतं, चुका शोधायचं ठरवलं तर कोणीही चुका शोधू शकतो. आपण इतके हुशार आहोत कि घरात बसून पंतप्रधानपासून नगरसेवक आणि शिक्षकांपासून डॉक्टर च्या चुका काढतो. पलंगावर पाय हलवत आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाच्या चुका देखील दिसतात. पण साधी आपल्या शहरातली निवडणूक   लढावायची लायकी नसते. पण हुशारी किती... आपल्या बुडा खाली अंधार चालेल पण दुसऱ्याच्या अंधार दिसला कि मग त्यावर बोलायला मोकळे.

जो कृती करतो तो चुकणार, पण जो कृतीच करत नाही तो चुकत नाही मग मिळालेल्या वेळेचा सदउपयोग म्हणून चुका काढत असतो. ज्याला काही काम नसतं, रिकामा वेळ असतो. त्या वेळी, त्या वेळेचा त्यांच्या संस्कारा मुळे ते उपयोग करतात.


चुका दाखवणाऱ्यांना वाटतं त्यांच्या कडून कधी चुका होतंच नाही. त्यांनी आपण माणूस आहोत हे कधी विसरू नये, माणूस म्हटलं कि त्याच्या कडून चुका ह्या होणारंच, चुकां मधूनच माणूस शिकत असतो. पण एकच चूक सारखी करू नये. 

एखाद्या कडून नकळत एखादी चूक झालीच तर त्या व्यक्तीला चार चौघामध्ये ओरडू नका. एकांतात त्या व्यक्तीला त्याची चूक समजावून सांगा. इतरांसमोर ओरडल्याने अपमानित झाल्यासारखे वाटते पण एकांतात समजावून सांगाल तर त्या व्यक्तीला तुमचा अभिमान आदर वाटेल. नाती घट्ट होतील. छोट्या छोट्या चुकांमुळे अनेक नाती विखूरली आहेत. त्यामुळे नातं ठीकवण्यासाठी कधी कधी आपली चूक नसताना चूक मान्य करावी. ज्याने नातं ठीकेल. आणि नातं ठीकलं तर जीवनाला अर्थ आहे नाहीतर विखूरलेल्या द्राक्षा प्रमाणे किंमत राहणार नाही. अनेक द्राक्षे एकत्र असतात तेव्हा त्याला किंमत असते ती विखूरलेल्या द्राक्षांना नाही.

"म्हणून सांगतो नाती ठीकवा. नाती ठीकवण्यासाठी कधी चुका दुर्लक्षित करा तर कधी चूक नसताना चूक मान्य करा. काहीही करा पण नाती ठीकवा. "


जगात सर्व सापडत मात्र स्वतःची सापडत नाही आणि दुसऱ्याची लगेच दिसते ती चूक !!!



No comments