अजून काय अपेक्षा असते ...
बायको ही नवऱ्याला फक्त शरीरसूख देण्यासाठी नसते तर तिने स्वतःसोबत नवऱ्याची देखील काळजी घेतली पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांवर जितकं प्रेम करते किमान त्याच्या अर्थ तरी नवऱ्याच्या आई वडिलांवर प्रेम करावं. त्यांची काळजी घ्यावी. त्यांच्या मुळेच आपल्याला नवरा भेटला आहे. याचं तिला भान असावं. नवरा फक्त आपला असं समजू नये. आपण आई वडिलांना सोडून आलो तसंच त्याने पण त्याच्या आई वडिलांना सोडावं अशी अपेक्षा करू नये. मात्र आज सुशिक्षित मुली असं वागताना दिसतात. त्या मुलींनी हे लक्षात ठेवावं त्यांचा भाऊ देखील लग्न झाल्यावर आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडेल. वृद्धापकाळात त्यांना मदतीची गरज असताना ते वन वन भटकतील आणि शेवटी वृद्धाश्रमात त्यांना जावं लागेल. अशी वेळ आपल्या आई बापावर आपल्या भावाने आणि भावजय ने आणू नये असं वाटत असेल तर आपण देखील आपल्या सासू सासऱ्यांना त्यांच्या मुलापासून वेगळं करू नका.
लग्न
झाल्यावर सुरवातीला 3-4 वर्ष काही स्त्रियानां माहेरच घर हे फक्त आपलं
वाटत, पण सासरच घर आपलं आहे असं वाटत नाही. त्यामुळे तिथे परक्या सारखं
वागतात. आणि त्याचा परिणाम घरातील क्लेश वाढतो. नणंद - भावजय मध्ये भांडण
होण्याचं मुख्य कारण. काही स्त्रिया सासरी वावरताना काटकसर करणे बचत करणे
विसरून जातात आणि मुक्त पणे उधलपट्टी करतात. कारण त्या घरात सासऱ्यांनी
कमवून घरातल साहित्य आणलेलं असतं. त्यामुळे त्याची जाणीव नसते. आणि म्हणूनच
कसंही कितीही वापरा, फेकून द्या अशी वृत्ती त्या स्त्रियां मध्ये येते.
आणि अगदी या उलट माहेरी मात्र प्रत्येक बाबतीत काटकसर करतात. कारण त्या
घरात बापाने काबाड कष्ट करून, घाम गाळून, मेहनत करून घरात साहित्य वस्तू
आणलेल्या असतात. स्वतःच्या बापाचे कष्ट, घाम दिसतात मात्र सासऱ्याचे दिसत
नाही.
आज काल मी पाहतो अनेक स्त्रिया सासू सासऱ्यांना आई बाबा म्हणतात,
मात्र त्यांच्याशी त्या त्याप्रमाणे वागत नाहीत. समाजात सुशिक्षित पणाचा
दिखावा दाखवण्यासाठी खोटं प्रेम दाखवण्यासाठी आई बाबा बोलतात. अशा देखील
काही स्त्रिया समाजात आहेत. त्यांनी आपल्या आई बापा प्रमाणेच सासू सासरे
यांना देखील स्वतःचे आई वडील समजावं. फक्त आई बाबा बोलून आई बाबा होत नाही
तर त्यासाठी मनात प्रेम असावं लागतं. "झाडाच्या वर पाण्याच्या कितीही
बाटल्या भरून ठेवल्या त्याचा उपयोग नाही तर ते पाणी त्या झाडाच्या मुळाशी
असेल तरच त्या झाडाची वाढ होईल." तसंच आहे. प्रेम, माया, आपुलकी ही मनात
असावी लागते. आई बाबा काबाड कष्ट करतात तसंच कष्ट सासू सासरे करतात. बाप
किंवा सासरे उन्हात शेती करतील तेव्हाच कष्ट करतात असं नाही तर AC मध्ये
बसून काम करणारे सासरे किंवा बाप तिथे देखील कष्टच करत असतात. कष्टा शिवाय
पैसा नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक स्त्रियांना आई बापा विषयी
काळजी वाटते, तशीच काळजी, आपुलकी सासू सासऱ्या विषयी वाटली पाहिजे. आणि ही
जर आपुलकी वाटत असेल तर नक्कीच प्रत्येक सुन ही सासू सासऱ्यांची काळजी
घेईल. आणि जर प्रत्येक सुनेने सासू सासऱ्याची काळजी घेतली तर नणंद का
रागवेल, का भांडण होतील नणंद - भावजय मध्ये?? कोणत्याच नणंदेला आपली काळजी
भावजयीने घ्यावी ही अपेक्षा नसते. तिने (भावजयीने ) मात्र आपल्या भावांची
आणि आई वडिलांची काळजी घ्यावी हीच अपेक्षा असते. आपला लहान भावाला वहिनीने
तिचा लहान भाऊ समजून त्याची काळजी घ्यावी. इतकी माफक अपेक्षा प्रत्येक
मुलीची असते.
प्रत्येक
सासूला सुने कडून इतकीच अपेक्षा असते कि, घरात आलेल्या नवीन सुनेने घर
व्यवस्थित सांभाळावं. आपल्या मुलाची काळजी घ्यावी. सकाळी लवकर उठून चहा
सोबत चपाती भाजी द्यावी. आपला मुलगा कामाला जात असेल तर त्याला वेळेवर
जेवणाचा डबा तयार करून द्यावा. कामावर जाण्या अगोदर घरीच 2 चपात्या खायला
द्यावा. कामात वेळ भेटेल तेव्हा जेवेल पण घरी नाश्ता करून गेला तर
आरोग्याला पण चांगलं आणि आपल्या समोर काही तरी खाऊन गेला याचं समाधान.
संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यावर दिवस भराचं दुःख त्रास बाजूला ठेवून
त्याच्या आनंदासाठी कोणतीही कीच कीच नकरता त्याच्याशी आनंदाने हसत खेळत
गुण्या गोविंदाने रहावं. मुलाच्या आवडी निवडी बायको पेक्षा आई ला जास्त
माहिती असतात. त्यामुळे आई सुनेला सुचवत असते काय करावं आणि काय करू नये.
प्रत्येक आई ला वाटत असतं आपल्या सुनेने आपल्या मुलाची काळजी घ्यावी. परंतु
आज काल च्या सुशिक्षित स्त्रियांना सासूचे अनुभवाचे बोल नकोसे वाटतात.
त्यांना ते ज्ञानाचे डोस वाटतात. आम्ही शिकलो म्हणजे आम्हाला सर्व समजतं ते
सासूने शिकवू नये. माझ्या नवऱ्याला काय हवं नको ते मी बघेन मला सर्व काही
समजतं असं वाटू लागतं आज कालच्या स्त्रियांना. सासूने आपल्या लेकासाठी
चपाती बनवून देयला सांगितली तर आज कालच्या मुली खारी, बटर, बिस्कीट देतात.
खरंच त्या चपाती मधून मिळणारी शक्ती / जीवनस्तवे त्या बिस्कीट किंवा बटर
मधून मिळतात. सासू जर काही अजून बोलायला गेली तरी झालंच भांडण समजा..... सासूने आपल्या मुलाच्या काळजीसाठी इतकं पण बोलू नये का?? कि
मुलाचं लग्न केल्यावर मुलावरचा अधिकार संपला???
✍️विलास अशोक जाधव
शोकांतिका आहे. छान मांडणी केलीय 👍👏👏👍👍
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete