विनंती
हा फोटो आहे आजचा (23 एप्रिल ). काल रात्री कडक लॉकडाउन सांगून सुद्धा आज ही गर्दी. काल रात्री सरकारने नवीन नियमावली जाहीर केली त्यात स्पष्ट सांगितलं होत अत्यावशक सेवे शिवाय सामान्य जनतेला रेल्वेने प्रवास नाही तरी आज ही गर्दी. या अगोदर ही सरकारने "ब्रेक द चॅन" अंतर्गत सौम्य लॉकडाऊन जाहीर केला होत. पण त्यानंतर काल पुन्हा कडक नियम करावे लागले याला सर्वस्वी जबाबदार आपण आहोत.
आज माझे हे शब्द मनाला लागतील माझा राग येईल पण आज सत्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा राग आला तर येउदे मला काही सूचना देयच्या असतील तर कंमेंट मध्ये द्या.
या कडक लॉकडाउन ला आपण जबाबदार आहोत असं म्हणतोय. फक्त तुम्ही किंवा सरकार असं न म्हणता मी स्वतः देखील याला जबाबदार आहे असं म्हणतोय कारण. आम्ही सुशिक्षित असूनही कोणाला तरी घाबरून किंवा पैशाच्या हव्यासापोटी आपण घराबाहेर जात होतो. काही अजूनही घराबाहेर जात आहेत. आपण बाहेर जाण खरंच गरजेचं आहे का ? एकदा विचार करा. आपण बाहेर गेलो नाही तर असं काय होणार आहे? आपण पोलीस, सफाई कामगार, डॉक्टर, नर्स, कि मेडिकल संबंधित काम करणारे आहोत याचा विचार करा. आपण खरंच आतावश्यक सेवे मध्ये येतो. आपण बाहेर जाण्याचं कारण हे अत्यावश्यक सेवे मध्ये येत ? खरंच बाहेर जाण हे अत्यावशक आहे ??
पोलीस किंवा सरकार अजून आपल्याला शिक्षा करत नाही तो पर्यंत आपण सुधारायचं नाही असं ठरवलं आहे का ???
सामान्य माणूस का घराबाहेर पडतो? अशी कोणती गरज पडते कि त्याला बाहेर जाण गरजेचं आहे. काहींना असेल ही गरज पण बाहेर पडणाऱ्या सर्वांना खरंच गरज आहे का ? या वरती दिलेल्या फोटो मध्ये सर्वांना आज घराबाहेर जाण गरजेचं होत??? आपण घराबाहेर जाऊन काय करतो याची कल्पना आहे का या लोकांना. घरात असणाऱ्या आई वडिलांची काहीही चूक नसताना त्यांच्या जीवाशी खेळता. भाऊ, बहीण, पत्नी, निरागस बाळ, आजू-बाजू वाले जे गप्प घरी आहेत त्यांच्या जीवाशी खेळतात हे बाहेर जाणारे लोक.
बाहेर कुठे तरी अनावधानाने स्पर्श होऊन येणार. जे बाहेर जातात त्यांना त्याची शिक्षा समजू पण जे गप्प घरी आहेत त्यांची काय चूक ?? हे बाहेर जाणारे का घरच्यांच्या जीवाशी खेळतात. मला वाटतं हे आत्यावशक सेवे शिवाय बाहेर जाणारे ज्यांना स्वतःच्या देशापेक्षा / परिवारापेक्षा बाहेर जाण महत्वाचं वाटतं त्यांनी मग त्या मध्ये प्राव्हेट कंपनी मध्ये काम करणारे असतील किंवा अन्य त्यांनी तिकडेच रहावं. Pvt. कंपनीच्या मालकाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपलं आयुष्य द्यावं. त्या कंपनीचे मालक किंवा त्याच्या खालील पदाचे अधिकारी ऑफिसला येतात का ?? याचा विचार त्या कामगारांनी करावा. ते बरोबर स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत घरी बसतात. आज स्वतःच्या जीवावर उदार होऊन कामगार कामावर जातात, उद्या या कोरोना मुळे मेलात, तुमचा मृत्यू होऊ नये पण समजा झालाचं तर हे कंपनी वाले तुमच्या कुटुंबियांना किती मदत करणार ? तुमच्या घरच्यांची काय अवस्था होईल याचा विचार करा त्या कंपन्याना नवीन कामगार मिळतील पण तुमच्या आई वडिलांना तुम्ही मिळणार नाही तुमच्या मुलाबाळांना त्यांचे आई बाबा मिळणार नाही ? त्यांनी काय करावं ??? याचा पण विचार करा ???? आणि मग खुशाल घराबाहेर पडून ज्यांची सेवा करायची त्यांची सेवा करत बसा....
आज इतके कडक नियम केले आहेत ते या लोकांना माहित नव्हतं का? जे या फोटो मध्ये दिसत आहेत. हे फोटो नालासोपारा रेल्वे स्टेशन चे. हे झालं एका रेल्वे स्टेशन वरच असे अजून किती ठिकाणी किती लोक एकत्र आले असतील देव जाणे. आपल्याला माहित असून माहित नसल्याचा आव आणणारे देखील काही असतात. प्रत्येकाच्या घरी टीव्ही असेल. टीव्ही बघायला वेळ मिळाला नसेल तर त्यांनी या लिंक ला क्लीक करून 👉 Whatsapp News ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा ते ही अगदी मोफत. आता सरकारने लॉक डाउन केला आहे. सरकार किंवा पोलीस यांनी अडकवावं त्यांनी बंधन लावावी याची अपेक्षा ठेवण्या पेक्षा आपल्याला काही वाटतं नाही का ? राष्ट्राप्रती आपली काही जबाबदारी नाही का आपलं काही कर्तव्य नाही का ???
मला वाटतं आपण सर्वांनी कोरोना थांबवायची जबाबदारी घेतली तर या कोरोनाला आपण थांबवू शकतो. आपण जर 8 दिवस घराबाहेर पडलो नाही तर काय होईल. उपाशी राहू, पैसे मिळणार नाही, अजून काय होईल. पण जर आपण बाहेर गेलो आणि कोरोना मुळे मेलो. मृत्यू झाला तर तो कमवलेला पैसा सोबत घेऊन जाणार आहोत का? कोरोना मुळे मेलो तर अंत विधी देखील आपल्या नातेवाईकांना करता येणार नाही आपल्या शवा जवळ सुद्धा कोणी येणार नाही. कुठे कोणत्या तरी स्मशानात आपली बॉडी रागेत असेल आणि त्यानंतर आपल्यावर अंत संस्कार होतील. आणि कुटुंबियांना आपलं मृत्यू पत्र दिल जाईल. घरच्यांना शेवटचं दर्शन देखील मिळणार नाही. आणि आपला शेवट होऊन जाईल. पण त्या पेक्षा 8 दिवस घरात राहून जर उपाशी मेलात, पैसे कमवता न आल्या मुळे मेलात तर किमान अंतिम संस्कार तरी घरचे करतील. शेवटचं दर्शन तरी घेऊ शकतील. आणि मला नाही वाटतं कोणी घरात 8-9 दिवसात उपाशी मरेल. घरात असणाऱ्या तांदळाच्या पेजे वर तरी जगता येईल. गप्प घरात असाल तर शेजारी पाजारी तरी मदत करतील उपाशी मरू देणार नाही असं वाटतं. घरात राहिल्या मुळे तरी किमान कोरोना चा प्रसार होणार नाही. अनावधानाने आपण कोरोना positive असेल आणि एक दिवस जरी आपण बाहेर गेलो तरी त्या एका दिवसात किती ठिकाणी आपल्या मार्फत त्याचा प्रसार होईल हे सांगू शकत नाही. आणि त्या प्रसारात आपण आपल्या घरच्यांना देखील बाधित केल जाईल. त्याला जबाबदार कोण. घरातील बाकी सदस्यांची काहीही चूक नसताना त्यांना शिक्षा. ते देखील आपल्यामुळे.
घरच्यांनी आपल्यामुळे मरावं का ????
विचार करा ! आणि मग घरा बाहेर पाऊल ठेवा.
No comments