text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

👪 पालकसभा 👪


रेश्मा शाळेतून घरी येत होती. आई किंवा बाबा येतील का उद्या पालकसभेला. की दरवर्षी प्रमाणे काही तरी कारणे देतील याचा विचार करत घरी येत होती. नेहमी प्रमाणे घरी आली. रात्री एकत्र जेवन करत होते. रेश्माला विश्वास होता आई बाबा काही पालकसभेला येणार नाही. मग त्यांना सांगून उपयोग काय. त्यांना पालकसभेच काही देनघेन नसत. 
तरी रेश्मा विचार करते या वर्षी आले तर आले म्हणूण सांगून बगाव, आणि म्हणूण जेवत असतानाच सांगते.
आई उद्या शाळेत पालकसभा आहे. तू येशिल ना. मात्र आई बाबांचे लक्ष त्यांच्या मोबाइल मधेच. शेवटी ती पुन्हा एकदा आई ला आवज देऊन विचारते. आई येशिल ना ग ??
आई,"कधी आहे पालकसभा" 
रेश्मा,"उद्या सकाळी 10 वाजता आहे".
आई,"मला घरी काम कमी नाहीत, आणि तुझ्या शाळेत येउन, घरी 11 वाजता पाणी येयील ते कोण भरेल ? तुझ्या बाबांना घेउन जा. एक दिवस लेकीसाठी काढला तर काय वाया नाही जाणार. त्यांना पण समजुदे मुलीची प्रगती. इत्यादि सुरू झाले....

हे आणि या सारखे अनेक पालक आपण आजूबाजूला पाहतो. मला खरचं समजत नाही की हे पालक का पालकसभेला जात नाही. इतके बिझी असतात की आपल्या स्वतःच्याच मुलांची प्रगती किती आहे, त्यांच्या शाळेत - कॉलेजमध्ये काय चालू आहे , किंवा त्यांना काय समस्या आहेत या विषयी जाणुन घ्यायला वेळ नाही. मी स्वतः शाळेत शिक्षक असताना पहिलं आहे. 35-40% पालक उपस्थीत असतात. बाकी 60-65% पालक इतके बिझी असतात की खरंच त्यांना त्यावेळी उपस्थीत राहने शक्य नसतं. मी म्हणतो त्यावेळी नाही शक्य तर शिक्षकांना एक फोन करून तस सांगा एक -दोन दिवसांनी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भेट द्या ना. फोन करयला नसेल शक्य तर आपल्याच मुलाकडे एखाद पत्र लिहून पाटवा ना. त्यां उपस्थित पालकांन मध्ये 1% - 2% पालक आपल्या मुलांना विषयी जागरुकतेने विचारपूस करतात बाकीचे पालक फक्त हजेरी लावायला पालकसभेला जातात. दुसर्या दिवशी आपल्या मुलांना काही शिक्षा होउ नये म्हणुन उपस्थितीत असतात.

पालकसभा ह्या शिक्षकांना हौस म्हणून नाही ठेवत. शिक्षकांची शिकवणे ही जबाबदारी आहेच पण त्या शिक्षकांना पालकांनी सोबत दिली तर नक्कीच अजुन चांगला मुलाचा विकास होईल. आपली मूल उंच शिखरावर पोहचली पाहिजे त्यांनी कर्तुत्व गाजवल पाहीजे अस प्रत्येक पालकांना वाटत. हे सर्व शक्य आहे मात्र त्यासाठी पालकांनी देखिल आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. शिक्षकांनी ठेवलेल्या उपक्रमात पालकांनी देखील सहभागी झाले पाहीजे. तरच आपण आपल्या मुलांना अष्टपैलू बनवू शकतो.

पालकसभा ही एक पालकांसाठी संधी असते आपल्या मुलांच्या जीवनाची वाटचाल कशी सुरु आहे हे लक्षात येते. त्यांच्या भविष्यासाठी अजुन काय करायला पाहिजे हे शिक्षकांशी चर्चा करुन ठरवता येत. मात्र पालक आपल्या मुलांना लागणारे पैसे देऊन आपली जबाबदारी संपवताना दिसतात. शाळेची फी भरली की सर्व शिक्षकांनी बगाव असा गैरसमज पालकांचा दिसतो. आपली मूल फक्त 6-7 तास शाळेत असतात. हे लक्षात ठेवाव. मुल ही अनुकरण करत असतात. आपण आपल्या मुलांन समोर शिक्षकांन विषयी कस आणि काय बोलतो ते मुल अनुकरण करत असतात. फक्त शिक्षकांना विषयीच नाही तर सर्वच बाबतीत मुल पालकांच अनुकरण करत असतात. 

पालकांनाच शाळेविषयी आपुलकी, आदर नसेल तर मुलांनमध्ये कसा निर्माण होईल. पालकांनी पालकसभेची वाट पाहत बसू नये. किमान स्वतःच्या मुलांसाठी तरी महिन्यातून एकदा वेळ काढून शाळेला भेट द्यावी. आपली नोकरी व्यवसाय आपल्या मुलांन पेक्षा महत्त्वाचा नाही. आपली पिडी जर वाया गेली तर आपल्या नोकरी व्यवसायाच करायच काय ? आई वडील दोघंही का शाळेला भेट देऊ शकत नाही ? एक दिवस वेळ काढला तर काय किती नुकसान होणार आहे ? जर आपण आपल्या मुलांना वेळ वेळ देऊ शकत नसु , आपण त्यांच्या पालकसभेला हजर राहू शकत नसु तर आपण पालक म्हणण्या योग्य नाही असे मला वाटते. आई वडील होण सोप असत पण पालक होण सोप नाही.

??✍ विलास अशोक जाधव

12 comments: