text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

आजची मुल

आज मला या बालकांन विषयी बोलाव वाटत.  

आपण आजूबाजूला पहिलं तर समजेल 50 % मुल ही पालकांच ऐकत नाही. ह्या मुलांना आपण लहानाच मोठ करायच आणि हयांनी आपल्याला शिकवायच. भले असेल मुलांच शिक्षण जास्त पण शेवटी पालकांन इतका अनुभव तर नाही ना. आणि मुख्य म्हणजे पालक आपल्या पाल्याच वाईट तर करनार नाही ना.
मग ही मुल का ऐकत नाहीत ? का धाक उरला नाही पालकांचा ? का तर शिक्षण जास्त झाल, चार बुक जास्त वाचली, इंग्रजी बोलता येत म्हणून यांनी पालकांना उलट उत्तर द्यावी. स्वतःच्या मनासारख वागाव. का , का पालकांनी ऐकून घ्यावं. या अशा लाडवलेल्या मुलांना नंतर पालक धाक दाखवायला जातात मग तिच मुल आई वडीलांना धमक्या देऊ लागतात. जिव देइन घर सोडून निघून जाईन वैगरे वैगरे.
या अशा मुलांना वेळीच धाक द्यायला पाहिजे होता. वय वर्षे 6 असे पर्यंत शिस्त लावली पाहिजे होती मात्र आपण तेव्हाच चुक करतो आणि लाडावून ठेवतो. आणि नंतर तोच बबडया किंवा बबडी डोक्यावर मिर्या वाटतात. 

अशा बबड्या आणि बबडीना पोलिसांच्या ताब्यात देऊन सुता सारखे सरळ करयला लावाव मात्र पोलीस मित्रांना काय कमी काम आहेत. ज्या मुलांना आई वडिलांचं घर लहान वाटत, घर नकोसं वाटत अशा मुलांना 2-3 दिवस पोलीस कोठडीत किंवा रस्त्यावरील कुत्र्याचा सोबत पाईपाच्या नळीत झोपण्याची वेळ आली की जाणिव होईल. समजेल घराची किंमत. 
घरच्या जेवणाला नाव ठेवणारयाना मंदिराच्या बाहेर बसवाव मग समजेल आईच्या हातच्या जेवणाची चव. 

प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवाव डोंगरा आड गेलेला सुर्य चंद्र पुन्हा येयील पण आई वडील पुन्हां नाही भेटणारा. त्यांच्या मुळे तुम्ही हे जग पाहताय. त्यांनी ठरवल असत तर ते काहीही करू शकले असते. त्यांच्या उपकारा मुळे तुम्ही आहात तुम्ही तुमच्या चामडीचे जोडे केले तरी त्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. तुमच जेवढ आयुष्य आहे त्यापेक्षा नक्कीच त्यांचा अनुभव जास्त असतो.

आई वडीलांनी घेतलेला निर्णय आजकाल मुलांना चुकीचा वाटतो आहे त्यांच्या हिताचा वाटत नाही . पण आई वडील आपल्या मुलांच वाईट करतील का ? अमंगल करतील का ? काही तरी विचार करून ते त्यांचा निर्णय घेत असतील ना. कधितरी पालक ही चुकत असतील ही. पण आपल्या पाल्याच अमंगल व्हाव वाईट व्हाव असा कधीच निर्णय घेणार नाही.

आजच्या मुलांना आई वडीलांचे विचार पटत नाहीत. ते जुन्या विचारांचे वाटतात. आई वडीलांन पेक्षा TV मधे दिसणाय्रा मालिका मधील नायक नायिका चे विचार पटतात. आणि अशा काही मालिका मधे मग स्वत:चा मूलगा लोकांन समोर परका दाखवणारी आई दाखवली जाते. स्वतःच्याच बापाची ओळख करून दिली जात नाही. त्याच्याच सोबत परक्या सारखे राहणारी मूल दाखवली जातात. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा लग्न करणारे नायक नायिका दाखवल्या जातात. एक वचनी एक पत्नी प्रभू रामचंद्रांच्या भूमीत अशा नायक नायिकाचा आदर्श डोळ्या समोर ठेवला जातो. पाश्चिमात्य संस्क्रुतीचा स्विकार करताना दिसत आहेत.

शेवटी मुलांना ईतकेच सांगेन

"तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही"


📖✍ विलास अशोक जाधव

2 comments: