text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

गणित...➕➖✖️➗



गणित हा विषय माझा नेहमीच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. खरंच मला समजत नाही की मुलांना हा नकोसा का वाटतो ? शालेय जीवनात या विषयाची अधिक भीती का वाटते ? गणित विषय आणि गणिताचे शिक्षक सर्वांत मोठे शत्रू का वाटतात ? 
मुलांना का समजत नाही आणि का समजावले जात नाही की आपण गणिता शिवाय जगूच शकत नाही.  आपल्या दैनंदिन जीवनात जितकी मातृभाषा उपयोगाची असते तितकेच गणित. अगदी सकाळी किती वाजता उठायचं किती वाजता झोपायचं या सर्वांत गणितच असत. अगदी आपण दात घासायचा ब्रश कोठे पकडायचा आणि त्यावर किती दंतमजन घ्यायचा याच प्रमाण देखिल गणित शिकवत. 

गणित म्हणजे असत तरी काय ओ ? चार क्रिया ➕ बेरीज ➕, ➖ वजाबाकी ➖, ✖️ गुणाकार ✖️, ➗ भागाकार ➗.
काय ? या पेक्षा वेगळ गणित असत का ? गणितातले विविध घटकच आपले जिवन सुखकर करतात. आपल्याला दैनंदिन जीवनात असंख्य वेळा मदत करतात. जसे की काळ, वेळ, अंतर, प्रमाण, चलन इत्यादी अनेक घटका द्वारे आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. आणि तरी देखील गणित का नकोसे वाटते ??? 

का ? आपण गणिताच महत्व पटवून देत नाही.


____📖✍ विलास अशोक जाधव

3 comments:

  1. Well done here is my link. Please share with your friends of can.https://paachiboy.blogspot.com/2020/05/the-haunted-house.html

    ReplyDelete