text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

🏡एका चुकीची शिक्षा 🏥🛌🏻



मानवा तुझी एक चुक तुझ घर 🏠 उध्वस्त करु शकते. विनाकारण घराबाहेर जाउन घरात बसलेल्या निष्पाप सदस्यांच्या मृत्युला कारण बनू नको. घरा बाहेर राक्षस 👺 उभा आहे. स्वतःहून त्याला भेटायला जावू नको. घरात बसलेल्या सदस्यांची काहीच चुक नाहीय रे . नशीब समज माणसा कोरोना स्वतःहून घरात येत नाही. त्याला घरात घेवून यायला आपणच बाहेर जातोय. त्यापेक्षा शांतपणे घरात बस. हो माहित आहे तुला घरात करमत नसेल. पण तुझ्या बाहेर जाण्याने काय होणार आहे याचा विचार कर.

तू रस्त्यावर उंदीर🐀 मेलेले पाहिले असशील ना ?
अगदी तशीच अवस्था होईल रे घरातील सर्वांचीच आणि त्याला कारणीभूत तुच असशील. त्यावेळी तुझ्या मदतीला कोणीही धावून येणार नाही अगदी देव सुद्धा. ना डॉक्टर काही करु शकणार ना सरकार ना तुझ्या कुटुंबातील कोणी. तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्याच कुटुंबातील सदस्य कुठे कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये 🏥 असतील माहीत नाही. तुझ्या नावाने रडत 😭 आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत असतील. तूझ्या चुकीची शिक्षा विनाकारण तेदेखील भोगत असतील. मात्र तु त्यावेळी त्यांना स्वारी देखील बोलू शकणार नाही. कारण तू देखील तुझ्या कर्माची फळ भोगत कोठेतरी तडफडत असशील. अरे तडफडून तु मेलास ना तरी कोणी येणार नाही रे. शेवटी मेलास तर तुझ्या प्रेताला हा समाज आंघोळी देखील घालणार नाही रे. तुझे मित्र परिवार नातेवाईक कोणीही तुझ्या अंत्ययात्रेला येणार नाही रे. तुला आपले समजणारे , स्वतःपेक्षा तुझ्यावर प्रेम करणारे कोणीही तुझा अंतिम विधी देखील करणार नाही रे. तुझ्या घरात इतके सदस्य असुन तुझ मडक देखील कोण फोडणार नाही रे. आयुष्यभर ईतकी माणसं जोडलीस पण तुझ प्रेत  बेवारस म्हणूनच पडलेले असेल. पशु-पक्षी, उंदीर, किडे-मुंग्या तुझ्या प्रेताचे लचके तोडत असतील. काय माहिती रे सरकारी कर्मचारी तरी तुझा अंतिम विधी करतील. की कचऱ्यात फेकून देतील. अस मरण दुष्मनाला देखील येवू नये पण हे अस मरण तुला येईल का तर तू विनाकारण घराबाहेर 🚪 जात होतास म्हणून.
मी एवढंच सांगेन घराबाहेर पाऊल 🚪ठेवताना स्वतःच्या मनाला विचारा बाहेर जाण हे माझ्या जिवनापेक्षा माझ्या कुटुंबीयांना च्या जीवना पेक्षा जास्त गरजेचे आहे. बाहेर जाऊन मी घरात काय घेवुन येणार आहे ??? की घरातील निष्पाप माझ्या मुलांनच आई वडिलांनाच आयुष्य उध्वस्त करणार आहे. याचा विचार करावा.

मी शेवटी एवढेच सांगेन जर माणसा तुला वाटत असेल की तुझ्या घरातील तुझी आई , बायको , मुल ही त्या रस्त्यावरच्या मेलेल्या घुशीं प्रमाणे तडफडत मरावी आणि त्यांच्या शरिराचे लचके त्या किड्या - मुंग्यानी तोडावे. पशु -पक्ष्यांनी मांसाचे तुकडे सर्वत्र करावे. अस वाटत असेल तर खुशाल घरा बाहेर जा.


🏠घर हे I.C.U. पेक्षा खूप चांगले आहे त्यामुळे स्वतःची व कुटुंबाची काळजी घरातच घ्या  🙏


पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, आदी आपल्या परीने आपल कर्तव्य पार पाडत आहेत त्यांना त्यांच्या कर्तुत्वाला सलाम !!! 


हौस थांबवा आता बाहेर जाण्याची
घरात बसून घ्या काळजी कुटुंबाची !!!



📖✍ विलास अशोक जाधव

2 comments: