ताटात जेवण किती घेतो!
ताटात जेवण किती घ्यायचं हे कशावरून ठरवतात ???
लागलेल्या भुकेवरून.
किती भूक लागली आहे, यावर आपण आपल्या ताटात किती जेवण घ्याच ठरवतो हो ना! असंच अनेकांना वाटतं, पण मला नाही असं वाटतं. मला वाटतं जेवण किती घ्यावं हे जेवणाऱ्याच्या भुके सोबत त्या जेवणाची चव आणि त्या चवी सोबत बरंच काही गरजेचं असत.
समजा, खूप भूक लागली आहे, जेवढ जेवण गरजेचे आहे त्याही पेक्षा जास्त जेवण समोर आहे पण त्याला चव नसेल तर? काय ? किती घेणार जेवण ताटात ??
भूक लागली आहे, जेवण पण चविष्ट आहे. पण नुकतच आपल्या प्रिय व्यक्ती सोबत आपलं भांडण झालं आहे किंवा ती प्रिय व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेली आहे. तर अशावेळी कितीही भूक लागली असेल आणि कितीही चविष्ट जेवण असलं तरी ताटात किती घेणार ??
भूक लागली आहे जेवण चविष्ट आहे पण जेवताना भांडण होत असेल तर ते जेवण कोणाला आवडेल ? कोण पोटभर जेवेल ?
एखाद्या मुलाला भूक लागली असेल त्याच्या समोर जेवण असेल आणि जेवायला सुरवात करायची असेल त्याच वेळी त्या मुलाचं कौतुक केलं, त्याने केलेल्या चांगल्या बाबींचं अभिनंदन केलं तर किती जेवेल. नक्कीच समाधानाने जेवेल. पण त्याच वेळी त्याच्या पालकांनी त्याच्या चुका उकरून काढल्या तर ते मूल किती जेवणार ??? त्याचा चुकांचा पाडा वाचून दाखवला तर
फक्त समोर स्वादिष्ट जेवण असून चालत नाही तर ते जेवताना आनंद, समाधान, शांतता देखील गरजेची असते.
तसेच जेवण घेण्याअगोदर चे काही क्षण याचा देखील परिणाम हा ताटात जेवण किती घ्यावं आणि किती जेवावं यावर होतो.
No comments