पुन्हा एकत्र येऊया !
तौक्ते वादळामुळे आज लाईट गेली होती. बाहेर पाऊस, वारा त्याच्यासोबत दुपार असून देखील अंधार होता. मे महिना उन्हाळ्याचा असतो त्यात आज निसर्गाने पावसाळा दाखवला. या वादळामुळे खूप नुकसान झाले. या वादळामुळे काही लोक घरात थांबले. मी देखील लाईट नसल्यामुळे असाच आपला मोबाईल घेऊन बसलो होतो. तेव्हा मला काही दिवसा पूर्वी बघितलेला पार्टी चित्रपट आठवला. आणि लगेच एक छोटासा msg टायपिंग करून त्याच्या सोबत D. Ed कॉलेज च्या ग्रुप ची लिंक त्यात add करून तो मॅसेज D. Ed च्या मित्रांना पाठवला. D. Ed. च्या मित्रांनी पुन्हा एकत्र यावं (व्हाट्सअप ग्रुप मार्फत ) यासाठी विनंती केली होती त्या मॅसेज मध्ये. हा मॅसेज का टायपिंग केला त्याच कारण खाली देतो.
आपण लहान होतो शाळा कॉलेज मध्ये,तेव्हा जात धर्म गरीब-श्रीमंत याचा भेद नकरता सर्वांशी आपली मैत्री होती. मित्रांनी ठरवलं कधी कुठे जायचं तर बिनधास्त जात होतो. अगदी एन्जॉय करत होतो, आपलं जीवन आपल्या मित्रानं बरोबर. एखादा मित्र शाळेत आला नसेल तर संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून होम वर्क सांगत होतो. ती मैत्री खूप घट्ट होती. इतकी कि आई वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे कधी कधी एखाद्या मित्राच्या परीक्षेची फी भरण्यास वापरत असो. मित्रासाठी काहीपण कधीपण कुठेपण असं अगदी छातीवर बोट ठेवून सांगत होतो. पुढे हळूहळू आपण मोठे होत गेलो. शाळा सोडून कॉलेजला जाऊ लागलो. काहींनी आपल्या आवडीने कॉलेज निवडली, तर काहींनी पालकांच्या आवडीने, तर काहींनी मित्र किंवा मैत्रीण जातेय म्हणून कॉलेज निवडून पुढचं शिक्षण पूर्ण केलं, तर काहींना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही तर काहींनी शिक्षणाची आवड नाही म्हणून शिक्षण घेतलं नाही. पण तरीही आपण आपल्या मैत्रीला विसरलो नाही. नेहमी नाही तर अधे मध्ये एकमेकांना भेटत राहिलो. वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांना भेटण्याची संधी शोधून भेटत होतो.
पुढे कॉलेज देखील संपलं, मग जो-तो आपापल्या करियर च्या वाटा शोधत मुंबई पुणे आणि अजून कुठे कुठे निघून गेले. जो-तो आपापल्या जीवनात सेटल झाला. अनेकांनी लग्न केली ते आपल्या मुलानं बाळा समवेत आहेत. प्रत्येक जण busy झाला. संसारात पडला आणि आपल्या मित्र परिवाराला विसरला. संसारात अडकून गेला. सकाळी लवकर उटायचं तयारी करून धावपळ करत कामावर पोचायचं रात्री कामावरून आलं कि फ्रेश होऊन जेवायचं आणि झोपायचं. यातच सर्व आयुष्य चाललं आहे. आपल्या सोबतचे मित्र कुठे आहेत काय करत आहेत कस जीवन जगत आहेत हे माहिती नाहीय. काही जण जीवनात यशस्वी झाले परंतु काही जण अपयशस्वी झाले. काहींच्या जीवनात अनेक अडचणीत आल्या. प्रत्येकाला पैशाची गरज नाही पण धीर पाहिजे आहे. काहीजण व्यसनाच्या नादी लागले आणि त्यात अडकून बसलेत. याची आपल्याला माहिती ही नाहीय. काहीजण प्रेमभंग, नैराश्य, बेरोजगारी, दारिद्र्य आदीचे बळी पडून झुरत आहेत. पण आम्हांला त्याविषयी काहीही माहिती नाहीय.
म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन एखादा ग्रुप तयार करून एकमेकांच्या संपर्कात राहूया. हो माहिती आहे आपल्या आवडी निवडीचे कामाचे अनेक ग्रुप आहेत त्याचेच msg वाचायला साधे बघायला वेळ नाहीय. पण मला वाटतं आपण जस आपल्या कुटुंबियांना वेळ देतो तसंच आपल्या सोबतचे मित्र जे मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी वेळ देऊया. ते आपल्याला आर्थिक मदत करणार नाही पण वेळ पडलीच तर नक्कीच धीर देतील. आपल्या मदतीला धावून येतील. आपण एखाद्याला मदत केली तर समोरचा त्याची या - ना त्या मार्गाने परतफेड नक्कीच करेल. त्यांनी परतफेड करावी म्हणून नाही तर आपण आपलं कर्तव्य समजून आपण मदत करू. त्याने नक्कीच आपल्या सोबत आपल्या मित्राची आणि समाजाची प्रगती होईल. नाहीतर शेवटी त्या पार्टी चित्रपटातील ओंकार सारखा एखादा मित्र आपल्या समोर आपल्यातून निघून जाईल. आणि आपण काहींचं करू शकलो नाही म्हणून पच्छाताप करायची वेळ येईल.
✍️ विलास अशोक जाधव
No comments