प्रेम खरं आहे ना ? कि फक्त दिखावा
काल मे महिन्यातील 2 रा रविवारी झाला. अनेकांचे व्हाट्सअप स्टेटस पहिले. जागतिक मातृ दिन साजरा करणारे स्टेटस ठेवले होते अनेकांनी. अगदी फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया वर काल मातृ दिन साजरा होत होता. आपल्या आई प्रती आदर व्यक्त केला जात होता. अगदी वृतवाहिन्यांवर सुद्धा त्याचे पडसाद पहावायला मिळाले. खरंच ते सर्व फोटो स्टेटस पाहून समाधान वाटलं. अनेकांनी आपल्या आई समवेत फोटो एका दिवसासाठी का होईना व्हाट्सअप, फेसबुक वर ठेवले होते. कालच्या दिवसासारखं आईवरचं प्रेम कायम स्वरूपी रहावे आणि निसर्ग देवता सर्वांच्या आई वडिलांना खूप सारं आरोग्यदायी आयुष्य देवो ! 🙏
मला वाटतं प्रेम हे जगाला दाखवण्यासाठी करू नये. आई वडिलांना जे काही वंदन करायच ते मनापासून करा. जगाला दाखवण्यासाठी नको. आपण आपल्या आईचा आदर करतो तिने 9 महिने आपलं ओझं आपल्या उदरात घेऊन फिरली. आपण 2 किलो च ओझं 2 महिने तरी दिवसरात्र घेऊन फिरू शकतो का ? जरा विचार करा त्या माऊलीचा. उपाशी तपाशी राहून सर्व सहन करून आपल्याला लहानच मोठ केला. याची कृतज्ञता म्हणून तिला थँक्स बोलायचं असेल तर आईच्या जवळ जाऊन तिला नमस्कार करून थँक्स बोला. तुमच्या भावना डायरेक्ट आई जवळ पोचवा. जगाला दिखावा करत राहू नका. ज्याच्या मनात आई वडिलांन विषयी प्रेम आदर नाहीये फक्त मित्रांना नातेवाईकांना जगाला दाखवण्यासाठी थँक्स बोलायचं त्यांनी... फेसबुक व्हाट्सअँप वर स्टेटस ठेवा. पण जर खरंच मनात प्रेम असेल. मनापासून थँक्स म्हणायचं असेल तर डायरेक्ट आई बाबांना त्याच्या जवळ जाऊन बोला. जवळ नसतील जाण शक्य नसेल तर फोन करा. मित्र मैत्रिणींना व्हिडीओ कॉल करता तस आज आई बाबांना करा. जर आपल्याला आपल्या मनापासून थँक्स बोलायचं आहे आणि आपल्याला आपले आई बाबा कोण हे माहिती आहे तर डायरेक्ट बोलायला काय प्रॉब्लेम ???
कालच काहींचं प्रेम हे एक प्रकारचे प्रदर्शन होत. निव्वळ शो / दिखावा असं माझं मत आहे कारण. काल इतके जण आई सोबत फोटो ठेवत होते आई वर प्रेम आहे मग का इतके वृद्धाश्रम दिसतात?? काल काही जणांनी आपल्या आई वडिलांसोबत फोटो ठेवले होते. पण त्या पैकी काहींचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. खरं प्रेम असतं तर आई वडिलांना सोबत ठेवलं असतं. मात्र काल काहींनी आपल्या सहकऱ्यांना मित्र मंडळीना दाखवण्यासाठी कविता, फोटो स्टेटसला ठेवले होते.
खरंच का ओ प्रत्येकाचे आई वडील सोशल मीडिया वर आहेत ???
प्रेम हे मनापासून मनापर्यंत डायरेकट जाऊ दे.
फोटो स्टेटसला, स्टोरीला ठेवण्यासोबत आपल्या मनात पण कायम ठेवा. आई वडिलांचा आदर करा. आपल्या बायकोच्या किंवा मित्र परिवाराच्या अन्य कोणाच्याही नादी लागून आई वडिलांना दुखवू नका. 🙏
✍️विलास अशोक जाधव
खुप छान 👆👌👌
ReplyDelete