text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

हे पटतंय का बघा !




 श्रद्धांजली आदरांजली अर्पण करून काय मिळत हे मला समजत नाही ? ज्या व्यक्ती मयत होतात त्यांचे फोटो स्टेटस ठेवून त्या व्यक्ती ते पाहणार आहेत का?? मग का? कशासाठी दिखावा करायचा?? जिवंतपणी कधी भेटायला जाणार नाही. ना कधी साधं फोन करून विचारपूस करणार आणि मेल्यावर मात्र लगेच चांगला होता त्याला आमच्या अमक्या तमक्या मंडळा कडून परिवाराकडून श्रद्धांजली आदरांजली इत्यादी.... खोटं प्रेम.... काही व्हाट्सअप ग्रुप वर फेसबुक वर पाहतो तर जे लोक त्या मयत व्यक्तीला ओळखत पण नाहीत ते श्रद्धांजली किती आणि आदरांजली किती विचारू नका.... हे सर्व दिखावा खोटं नाटक करतात.... ते मला पटत नाही.


मी हे बोलतोय याचा राग येत असेल. भावना दुखावत असतील पण मी हे आज का बोलतोय ते समजून घ्या. 🙏


आपल्या आजू बाजूच्या परिसरातील किंवा नातेवाईकांन पैकी कोणी निधन पावलं तर लगेच त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. पण या कोरोना च्या काळात अनेक लोक हॉस्पिटल मध्ये आहेत. त्यांना ही बातमी समजते आणि खचून जातात. मनात पुन्हा नैराश्य येत.... आपल्या जवळच्या/माहितीतल्या व्यक्तीचे निधन झालेस लगेचच त्यांचा श्रध्दांजली करीता फोटो व्हाॅटसअप व फेसबुक वर टाकु नका. कारण त्याचे घरातील लोक ही कोरोनावर उपचार घेत असतात, त्यांना अजुन ते माहिती नसते. ती बातमी समजली कि त्याच्या नातेवाईकांना दुःख होणं साहजिक आहे.... अनेक लोक या धक्या मुळे मृत्यूमुखी पडले आहेत.... आणि म्हणून मी नम्र विनंती करतो 🙏 कृपया श्रद्धांजली आदरांजली अर्पण केली नाही तर काय फरक पडणार नाही. मृत्यू नंतर केले जाणारे विविध विधी आता कोणी करत नाही. काही नातेवाईक तर प्रेता जवळ जात देखील नाहीत. त्यांचा अंत विधी देखील करत नाहीत. तो देखील सरकारी कर्मचारी करत आहेत. आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत ,त्यांचे ना पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत.



मग आपण देखील श्रद्धांजली अर्पण करण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबियांना काही मदत करता आली तर करूया. आर्थिक मदत नसेल करता येत तर किमान धीर देऊन आत्मबलं वाढवूया!


✍️ विलास अशोक जाधव 

4 comments: