दृष्टीकोन
🌸🌸🌸🌸...दृष्टीकोन...🌸🌸🌸🌸
शेजारच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं...म्हणून आई - बापानं अवघ्या १३ व्या वर्षी लग्न करून दिलं, पुरत शहाणपण ही आल नव्हतो हो....नवरा काय , सासू सासरे काय, नणंद काय काही समजत नव्हत...
उन्हाळ्यात सुट्टी साठी आलोय आपण दुसऱ्यांच्या घरी...महिना दोन महिने राहू आणि परत घरी...असा बीचारीचा समज...पण खूप दिवस झाले तरी आई बाबा न्यायला आले नाहीत...रोज त्यांच्या वाटे कडे डोळे लाऊन होती ती...आज येतील उद्या येतील....दिवाळी ला भाऊ आला...ती एवढी खुश ,..."मला न्यायला आला न दादा, मला इकडे नाही करमत...खेळायला नाही मिळत रोज सकाळी लवकर उठाव लागत, शेन सारा काढावं लागत, आई कुठे हे सगळ सांगत होती मला मला घान वाटते, तरीही करावं लागतं, भाकरी भाजता भाजता कित्तेक वेळा चटका लागला पण कोणी फुंकर घालत नाही, बाबा तर अख्ख घर डोक्यावर घ्यायचे तू चुली जवळ का गेलीस म्हणून मलाच दम द्यायचे...इथे पूर्ण दिवस चुली जवळ जातो, सासूबाई येऊन समजाऊन जातात पण आई सारखी माया नाही त्यांच्यात, भाजतय" तर भाजुदे की त्याशिवाय भाकऱ्या येतात व्हाय" असं म्हणतात.....चहा ,नाष्टा, जेवण सर्व मीच करते..सुरुवातीला जमत नव्हतं पण आत्ता सगळ छान जमत....या सहा महिन्यात खूप शिकले मी...आता आई ला त्रास नाही देणार तुला आणि बाबा ना मीच जेवण बनाऊन देणार आई ला आता आराम..." हे सगळ एकूण भावाचे डोळे भरून आले...आपली इवलिशी चिमणी मोठी वाटू लागली..." मी तुला माहेरी दिवाळी साठी न्यायला आलोय ग"..."माहेरी काय, म्हणतोय दादा आपल्या घरी म्हण ना.... हे आपल घर नाही, इथे माझं असं कोणी नाही सर्व माझा फक्त उपयोग करून घेतायत..." "दाजी कसे राहतात ग तुझ्या सोबत" "कोण दाजी"
" अग ज्यांनी तुझ्या गळ्यात हे बांधलं" (मंगळसूत्र दाखवत भावाने विचारलं)
तशी ती ढसा ढसा रडू लागली
"तो मला अजिबात नाही आवडत रोज रात्री येतो खोलीत येतो...त्याला हवं ते करतो आणि नाही करू दिला तर खूप मारतो मला" मला घेऊन चल न दादा....आपल्या घरी"
तिला समजावत भाऊ - " आता हेच तुझं घर बाळ आणि ते तुझं माहेर तिकडे तू कायमची येऊ नाही शकत ..माहेर पानासाठी येऊ शकतेस ४-५ दिवस"
अवध १३ वर्ष वय असणाऱ्या मुलीने हे कसं पचवाव की जिथे ती लग्नाची मोठी झाली ते तीच घर नाही....आणि जिथे तिला कडीची ही किंमत नाही अशा ठिकाणी तिने आयुष्य घालवायचं....
काय चुकी होती तिची....
शेजारची मुलगी पळून गेली म्हणून आपल्या मुलीचा अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात बापाने लग्न करून दिलं...तिला लग्न काय असत हे ही माहित नव्हत जबाबदारी घेण्या इतकी भक्कम खांदे ही नाही हो तिचे... कवळी पोर ती...
काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची जेव्हा याच घरात आपल्याला कायमचे राहायचे आहे हे समजल्यावर....
तरी मन घट्ट करून सर्वतोपरी प्रयत्न करून तिने सोन्या सारखा संसार केला...
ती स्वतःच लहान असताना ती आई झाली वयाच्या १६ व्यां वर्षी तिने एका छान गोंडस मुलाला जन्म दिला...आता तिला ही सगळ्याची सवय झाली होती..कसलीच तक्रार न करता ती हसत मुखाने संसार करत होती....
तिचा नवरा ही आता तिच्या प्रेमाने थोडा फार नीट वागत होता...लोणचे जसे जास्त मुरले की चविष्ट लागत....तसाच तिचा संसार चवीचा झाला...पूर्ती हरपून गेली ती जबाबदाऱ्या चा गाडा ओढत ओढत.. सून, पत्नी आई असे सगळे पात्र ती व्यवस्थित पार पाडत होती....
बरीच वर्ष गेली मुलगा आता चांगला मोठा झाला...तिचे ही २-४ केस पांढरे झालेच...एवढे वर्ष आपण केलेलं घराचा सांभाळ आता दुसरं कुणीतरी येऊन आपली सुटका करावी अशी तिची आकांशा होती....
साहजिकच मुला च्या लग्नाचा विषय सुरू झाला...
एका मुलीचं स्थळ सांगून आले...
मुली कडच्याना घाई होती
म्हणून मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरला...
तसे ते तिघे मुलीच्या घरी गेले
ती, तिचा नवरा आणि राजबिंडा मुलगा...
सगळी कडे आनंदी वातावरण होत
चहा घेऊन मुलगी समोर आली....
तशी ती झटकन उभी राहिली....
काही काळासाठी स्तब्ध झाली....
कारण मुलगी एवढी १२-१३ वर्षाची होती...
तिला तिने सहन केलेला सर्व त्रास डोळ्या समोर दिसू लागला...
मी एवढी शिकलेली नाही पण एवढं तर समजत मला की माझा मुलगा २४ वर्षाचा आहे आणि तुमची मुलगी एवढी लहान कसं जमणार हे लग्न....
नंतर तिने विचार केला की जर मी आज नाही म्हटलं तरी उद्या दुसऱ्या ही लोक दुसऱ्या कुणाशी तरी या लहान मुलीचं लग्न करूनच देणार
आणि तुलाही त्या नरक वेदना सोसाव्या लागतील...ज्या मी सोसल्या आहेत...काय करावं काही समजत नव्हत.
तिने अडचण विचारली की तुम्ही का या मुलीचं एवढ्या लवकर लग्न करून देताय...
तर तिची आई रडू लागली...
"ताई आमच्या गावचा सरपंच आहे त्याच काही देणं आहे...ते देणं जर मी दिलं नाही तर तो माझा मुलीला पळून नेऊन तिचा नास करेल अशी त्याने धमकी दिली आहे...म्हणून लवकरात लवकर तीच लग्न करून तिला तिच्या घरी पाठऊन द्यायची आहे म्हणजे ती सुखी होईल"
"अहो पण हा तुम्ही तुमच्या बाजूने विचार केला..त्या मुलीचं काय, लग्न काय, संसार काय हे देखील तिला माहीत नाही...तिचे खेळण्या बागडण्या चे दिवस आहेत तिच्या वर अन्याय करतायत असं नाही का वाटत तुम्हाला"
"काय करणार ताई इकडे आड तिकडे विहीर झालाय....इथे राहूनही कुठे तीच भल होणार आहे...म्हणून लग्न लावून देत होती"
थोडा वेळ विचार करून पाती आणि मुलगा यांच्याशी एक मत करून ती म्हणाली...
" मला तुझी मुलगी सून म्हणून नकोय...पण एक आई होऊन तिचा मुलगी म्हणून मी सांभाळ करायला तयार आहे....त्या मुळे ती सावकाराच्या तावडीतून ही सुटेल आणि तीच भविष्य ही खराब होणार नाही...मला एक मुलगा आहे...पण त्याला राखी बांधणारी बहीण नाही....तिची सर्व जबाबदारी मी घेईन योग्य वयात तिचं लग्न ही लाऊन देईन....तुम्ही अधून मधून येत जा तिला भेटायला....चालेल ना"
मुलीचं तिच्या वय पेक्षा दुप्पट माणसा शी लग्न लाऊन देण्या पेक्षा मुलीच्या दृष्टीने आई - वडिलांना हा मार्ग ठीक वाटला..
आणि सून आणण्यासाठी गेलेली "ती" एक मुलगी घेऊन घरी परतली....
तिच्या डोक्यात हाच विचार घोळत होता...
माझ्या ही सासूबाईंनी...असाच विचार केला असता तर....त्यांनी माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असता तर....आज माझं भविष्य काही वेगळं असत....
असो...सुरुवात कुठून तरी व्हायला हवी होती ना....ती माझ्या पासून झाली...हे काय वाईट आहे का?
दृष्टीकोन बदलला की सगळ सहज शक्य होत....🌹❤️
No comments