text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

प्रसंगावधान 🏊




दुपारची वेळ होती. रणरणत ऊन  असूनही आम्ही चौघेही ओढ्यावर  गेलो. मी, माझा भाऊ, अन् दोन बहिणी असे मिळून आम्ही ओढ्यावर गेलो. नेहमीचच कपडे धुवायचे आणि  अंघोळ करणे ही जणू त्या ओढ्यातील परंपराच! मला आठवते,  अजूनही ती परंपरा अख्खा गाव जोपासत आला आहे असे म्हणावंयास काहीच हरकत नसावी. कारण शिमगा असो नाहीतर गणपती किंवा दिवाळी मुंबई चे चाकरमनी त्या ओढ्यावर जायची परंपरा विसरणे  कठीण. अश्याच प्रकारे आम्ही दररोज कपडे धुवायचे अन् अंघोळ, अशी आमची सुट्टीतील आमचा जणू पोर खेळच असावा. तसे पाण्यात पूर्ण कातळ असल्यामुळे पाय घसरण्याची चांगलीच पंचाईत व्हायची. पण पुढे मात्र उंच आहे, असे असून काही जुन्या घडलेल्या त्या ओढ्यातून बुडून मरण पावतात अश्या काही कथा आज्जी आजोबांकडून तश्या ऐकलेल्या होत्याच पण तेव्हा अक्कल कुठे आम्हाला, तरी सुद्धा आम्हांला घरातून बजावून सांगायचे उंच भागात जाऊ नका. पाणी खूप खोल आहे.असे अनेक किस्से सांगत असत.

        रोजच्या प्रमाणे कपडे धुवून झाले. नंतर काय तर मज्जाच मज्जा येईल अश्या आशेने आम्ही अंघोळीला उतरलो. मोठी बहीण सांगत बसायची नुसती पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ असे सांगायची परंतु ऐकतं कोण! तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.त्या दिवशी तर हदच झाली पुढे जाता जाता पाय घसरत पुढे पुढे केव्हा गेलो मलाच समजलेच नाही. मी घाबरलो,  परंतु या तिघांनी मला रोजच्या प्रमाणे मी मज्जा करतोय हा असा गोड गैरसमज करून घेतला. मी मात्र बाहेर येण्याच्या प्रयत्नात पाय हलवत होतो. मी पाय पुढे करतो तर पाय पूर्णपणे खाली ओढत असल्यासारखा भास होई. मी आवाज दिला आणि सांगितल या तिघांना की मी बुडतो आहे .  मी खाली जातोय. अस दिसताच क्षणी त्या तिघांची जणू  कसरतच सुरु झाली,  मला  वाचवण्याची धडपड सुरू झाली. त्यांना समजत नव्हते काय करावं ते, मला यांनी सहजरीत्या वर काढले असते जर आम्हा चौघांपैकी एकाला तरी  पोहता येत असते ... मी पूर्णपणे पाण्याखाली गेलो. वरील काहीच दिसत नव्हतं. परंतु माझे डोळे उघडे होते म्हणून त्या चौघांपैकी तिघांचे फक्त पाण्यातून पाय दिसत होते. मी हताश होऊन संपलो आपण असे वाटले. परंतु सुदैवाने माझ्या तसे दैवात नव्हते मरण, म्हणून मी आत्ता तुमच्या समोर हा लेख म्हणण्याऐवजी प्रसंग आपणासमोर मांडत आहे. जणू त्या दिवशी दैवाने मला वाचवण्याकरिता संदेश च पाठवला असावा. सुदैवाने मला वाडीतील सख्खा चुलत भाऊ जो त्या ओढ्यावर केव्हा फिरकायचा सुद्धा नाही तर त्या दिवशी कोणत्या रूपाने किंवा जणू देवानेच पाठवला असावा. त्याने इकडे तिकडे न बघता सरळ पाण्यात उसंडी मारली आणि  माझा जणू मृतदेहच वरती काढला. बाजूला कातळ असल्यामुळे कातळावर झोपवले. नाका तोंडातून पूर्ण पाणी पोटात गेले होते. त्याने काय केले ते मात्र माहीत नाही. परंतु माझा जीव वाचला होता. त्याने इकडे तिकडे न बघता सरळ आम्हाला घरी जाण्यास सांगितल्याप्रमाणे आम्ही घरी आलो. तेव्हा मला अजबच वाटलं की काही न बोलता तो आपल्या घरी अन् आम्ही आमच्या घरी आलो. खूप दमल्यासारखे वाटत होते. म्हणून मी घरी आलो अन् झोपी गेलो. ते थेट जाग आली सायंकाळी सात वाजता दिवे लावण्याच्या वेळेस, जाग  येताच मी अंथरुणावरच जणू शपथ घेतली की पुन्हा त्या ओढ्यावर त्या पाण्यात उतरायचं नाही. असाच तो माझ्या आयुष्यातील भयानक जीवघेणा प्रसंगाने मला आयुष्य वाचवण्यालायक आहे हे सांगून दिले.जसे सुदैव हे भित्र्या माणसांच्या बाजूला नसते त्याच प्रमाणे आयुष्य परिपुर्णतेने जगण्यासाठी जास्त धोके पत्करायला हवे ना अश्या आशेने पुन्हा पुन्हा जगण्यास सुरूवात !!!

‌      दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला वाचवणारा त्याला आभार कसे मानायचे हेच समजत नव्हते परंतु त्याच स्थितीत मी त्याच्याकडे गेलो आणि त्याचे आभार मानले त्याने विचारलं, कशाबद्दल ? मी उत्तर दिले मला वाचवल्याबद्दल. त्याने माझ्याकडे एकवार निरखून पाहिलं आणि म्हणाला, पुन्हा अश्या खोल असलेल्या पाण्यात जायचे नाही अशी जणू दमदाटी दिली, मी मान हलवून फक्त हो म्हणालो. पण मला त्याचे अजब केव्हा वाटले एवढा मोठा प्रसंग असूनसुद्धा त्याने घरातील एकही व्यक्तीला सांगितले नाही. का? कुणास ठाऊक ! तेव्हा पासून आपलं आयुष्य वाचवण्यालायक होतं हे सार्थ करायचं. विचार करण्याची मला वाटतं हीच वेळ असावी असे मला वाटले आणि अंतर्मनाला कळवळून सांगितले आज मला वाचवले मनून मी वाचण्यालायक होतो म्हणून  मी वाचलो म्हणजे मला काहीतरी करायचं आहे या हेतूने मला मिळालेला इशाराच होय. कदाचित म्हणजे माझ्या असा संकल्पपूर्वक निर्धार करून माझ्या नव्या प्रेरणादायी जीवनास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असावी. तेव्हा ठरवलं की जन्माला आलोच आहे तर सार्थक करून मगच मरायचं. जीवन हे असं सहजा सहजी नाही मिळत रे मित्रानो!   म्हणून प्रिय मित्र मैत्रिणींनो आपण सुट्टीतून मज्जा करण्यासाठी काहीजण मामाच्या गावी तर काही आत्त्याच्या गावी तर काही मावशीच्या गावी असताना अश्या अनेक प्रकारच्या घटना किंवा प्रसंग उदभवु शकतात म्हणून काळजी घेतली पाहिजे.

‌ वरील प्रसंगाने आयुष्यात मात्र नवीन काहीतरी शिकायला मिळालं हे मात्र नक्की !!!

‌ जे काही करता येईल तेवढं करायचं.
‌ जितकं शिकता येईल तेवढं शिकायचं.

‌ आपल्या कुटुंबातील कोण्या व्यक्तीचा सन्मान वाटेल असेच नेहमी रूबाबने जगायचं.
‌ आपली धन दौलत संपत्ती आपल्या मरणानंतर काय होईल हे आपणास ठाऊक नसते तर या जिवंत देहाचा काय विचार सातत्याने करत रहावा जे काही होईल ते चांगलं होईल या प्रामाणिक ऊर्जेवर माणसाने आपली ध्येय गाठता येईल. म्हणून मित्र मैत्रिणींनो आयुष्यात स्वप्न जरूर ठेवा आणि ती पूर्ण करता आली पाहिजे.

तुमचं आयुष्य वाचवण्यालायक बनवा. नेहमी ऋणी राहायला शिका. नेहमी समाधानी रहा. जे आहे ते माझे आहे आणि जे गेले ते माझे नव्हतेच या विचारांचा प्रभाव ठेवा.आयुष्य ही अशी पायरी आहे की तुमचा जन्म आणि मृत्यू यामधील महत्त्वाचा घटक आहे. त्या घटकाला विघटक बनवायचे की घटक बनवायचे हे मानव वृत्तिवर अवलंबून असते. जस म्हणतात ना की जिंदगी मिलेगी ना दुबारा! अश्या प्रमेयावर जोर देऊन भरभरून जगा. 

शेवटी अशी इच्छा प्रकट करून हा लेख पुरा  करतो.


‌तात्पर्य:- 🤲
 समधानाशिवाय यशाला काही अर्थ नाही. माणसाजवळ कितीही प्रतिष्ठा पैसा आणि पदव्या असल्या तरी काही निश्चित उद्दिष्ट आणि जीवनदृष्टी नसेल तर आयुष्य रितं भकास असतं.


✍️ अभय सदाशिव जाधव

2 comments:

  1. ह्या लेखाचं तात्पर्य मला खुप प्रोत्साहित करून गेले. आयुष्यात पैसा संपती महत्त्वाचं नसत.आपण कुठल्या गोष्टींमधे समाधानी आहोत हे महत्त्वाचं आहे.

    ReplyDelete