text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

आपली पण आईच असते !!!

मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि 
गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई.


 

घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी, घार आकाशात खूप उंच उडते पण तिचे मन हे तिच्या पिल्लां जवळ असते हे आम्हाला समजते, अगदी कोंबडी सुद्धा आपल्या पिल्लांना पंखाखाली घेवून असते तिला काही खायला दिले तरी ती स्वत: खाण्या अगोदर, त्या दाण्या जवळ चोच मारून पिल्लांना खाऊ देते . मांजर / कुत्री इत्यादी प्राणी आपल्या पिल्लांना तोंडात घेऊन त्यांची जागा बदलतात त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवतात. त्यांना तोंडात धरून ही त्यांच्या आईचे दात त्या पिल्लांना लागत नाही. ती आई त्या आईची माया आपल्याला कळते. मात्र आपली आई आणि आपल्या आईची माया खरंच आपल्याला कधी कळते ? रस्त्यात किंवा मित्र मैत्रिणींच्या  घरी गेल्यावर त्यांच्या आई ची चौकशी करतो कशा आहात ? औषध गोळ्या वेळेवर घेतांना ? इत्यादी, मात्र आपण आपल्या घरी आपल्या आईला कधी विचारतो का ???

आपल्यावर आपली आई ओरडली रागावली तर आपल्याला राग येतो, आई नकोशी वाटते घर नकोस वाटतं तीच रागावण नकोस वाटतं. प्रत्येक आई आपल्या मुलांवर रागवते ते मुलांच्या हितासाठीच. मात्र ते आम्हाला समजत नाही . 

मांजर आपल्या पिल्लांच्या सुरक्षितेसाठी त्यांचं स्थलांतर करताना दातात ठेवते !!

अगदी त्याच प्रमाणे आपली आई आपल्या भल्यासाठी धाकात ठेवते !!

 

 आपण किती शिकलो, किती मोठे झालो, तरीही आपल्या आईसाठी आपण बाळच  असतो, हो ! तीच लहान बाळ. 


कारण आपलं कितीही वय वाढल तरी आपण तिच्या इतके पावसाळे अनुभवले आणि पाहिलेले देखील नसतात . कितीही शिक्षण घेतले तरी तिच्या इतके अनुभव आपल्या गाठीशी नसतात. त्यामुळे आपण नेहमी तिच्या समोर नम्र राहिले पाहिजे. 

प्रत्येकाची आई प्रत्येकावर तितकच प्रेम करत असते. इतकं प्रेम की जगात तेवढं प्रेम कोणीही करू शकत नाही. कारण आई ही आपण जन्माला येण्या अगोदर पासून आपल्याला ओळखत असते आपल्यावर प्रेम करत असते. जन्माला येण्यापूर्वी पासून आपली काळजी घेत असते . म्हणून आईला कधी कोणी प्रियसी किंवा पत्नी मिळाली म्हणून दूर करू नका . परंतु आपल्याला मात्र आपल्या आईच्या प्रेमापेक्षा प्रियसीच किंवा पत्नीच प्रेम आपल्यावर जास्त आहे असं वाटू लागतं. आईच्या प्रेमाची तुलना ही प्रियसीच्या किंवा पत्नीच्या प्रेमाशी करता येणार नाही. आपल्या लेकराला जिवापेक्षा जास्त फक्त आपली आईच प्रेम करू शकते. आपल्या लेकरासाठी एक आई काहीही करू शकते. काट्या कुट्यात राबून आपल्या लेकराला साहेब बनविण्यासाठी सुध्दा एक आईच मेहनत करू शकते. स्वतः उपाशी राहून सुध्दा लेकरू उपाशी राहू नये याची काळजी देखील आई घेत असते, आईच प्रेम हे अगणिक आहे त्याला अंत नाही. प्रत्येक आईचं प्रेम हे निस्वार्थी असतं, तीच आपल्याला लहानपणापासून या जगाचे दर्शन करून देते, कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता आपल्या लेकराला भासू देत नाही. आईचा महिमा अपरंपार आहे. तिच्या पुढे सर्वांचे प्रेम हे फिके पडते. म्हणून आईला जपा आणि तिला दुःख होईल असे कोणतेही काम करू नका.

दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की,
सुखाचा वर्षाव होत असो, 
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि,
आठवणीतले तारे लुकलुकत असो, 
आठवते ती फक्त आई.


2 comments:

  1. अप्रतिम सुंदर अशी आईची माया सांगणारा लेख वाचून मला खूप बरं वाटलं.💯💫❤️
    👍👍👍🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏 आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल

      Delete