text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

आठवण


प्रिये जिवनात असे काही दिवस येतील 
आणि त्या दिवसांमधे असे काही क्षण असतील
त्या वेळी फक्त माझीच आठवण येयील.

सभोवताली असतील सारे पण माझी कमी नक्कीच भासेल.
तुझ्या सभोवताली असतील सर्व पण माझी आठवण नक्कीच येयील.

तुला बघायला कोणी येईल तेव्हा बसशील तयार होवुन मात्र त्याला
 पाहुन माझी आठवण नक्कीच येयील.

लग्नपत्रिकेत चि.सौ.का. म्हणुन तुझ नाव असेल तेव्हा माझी आठवण नक्कीच येयील..

हातात पत्रिका घेवुन नक्कीच रडशील

तुझ्या अंगाला हळद लागताना माझी आठवण नक्कीच येयील
तुला हळद लावायला मी आलेलो पाहुन चेहर्‍यावरचा आंनद जावुन आपली स्वप्न नक्कीच आठवतील.

आई—बाबांच्या आनंदासाठी चेहर्‍यावर हसू ठेवशील मात्र आसू लपणार नाही. 

लग्नाच्या वेळी आजुबाजू असतील सर्व मित्र मैत्रीणी मात्र समोर माझीच गरज वाटेल.

लग्नानंतर प्रत्येक उखाण्यात नकळत माझच नाव येईल.

तुझ्या पतीराजानी आवाज दिला तरी तुला माझाच भास होईल.

तुझ्या पतीचा शरीराला स्पर्श जरी झाला, तरी आठवण माझीच येयील.
तुला तू आई होणार हि बातमी समजताच ते मलाच सांगावस वाटेल.
त्यादिवसात इतरांना होतात वेगवेगळ्या ईच्छा, तुला मात्र मला भेटावस वाटेल.

बाळाला जन्म देताना आईची आठवण होईलच मात्र त्यावेळीही घट्ट माझाच हात पकडावा वाटेल.
तुझ्या बाळाच नाव ठेवायला जमतील सारे तेव्हा पण माझीच उणिव भासेल.

तुझ्या बाळाला बघुन तुझ्या चेहय्रावर आनंद होईल, तेव्हा पण माझीच आठवण येयील.

बाळाला रांगताना पाहुन आपल्याच पिल्लाची स्वप्न आठवतील
बाळाला च्याऊ माऊ चा घास भरवताना माझ्या भुकेची आठवण नक्कीच होईल.

बाळाने धावत येवुन मारलेल्या घट्ट मिठीत माझा भास होईल.
बाळाला उराशी धरल्यावर माझ्यावरच्या प्रेमामुळे माझाच भास होईल.

बाळाने मम्मा म्हटल्यावर माझ्या आठवणीने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

ईतक सर्व नक्कीच होईल कारण तू माझ्यावर स्वतः पेक्षा कितीतरी पटीने प्रेम केलय, मला तुझा जीव समजून माझी काळजी घेतलीयस.

बाजारातुन भाजी आणताना माझी आठवण होईल कि नाही माहित नाही पण ताटातली भाजी संपवायला माझी आठवण नक्कीच होईल.

संसार रुपी गाढा ओढताना माझी आठवण होईल कि नाही माहित नाही पण काही क्षणांना माझी आठवण नक्कीच होईल.

जिवन जगताना घडलेल्या नविन गोष्टी सांगण्यासाठी माझीच आठवण येयील.

तुझ्या सुखाची स्वप्न पाहणाय्राच्या यादित माझ नाव आहे.

तुझ्पा चेहय्रावरच समाधान पाहण्यासाठी मी कायम आतुर आहे.

तुझ्या आनंदात माझा आनंद मानणारा मीच आहे.
तुझ्यासाठी स्वतःच आयुष्य द्यायला मीच आहे.

तुझ्यासाठी शरिराचा प्रत्येक भाग अर्पण करावयास तयार आहे 
शरिराच्या प्रत्येक अवयवावर तुझा अधिकार आहे 

ईतक सर्व नक्कीच होईल कारण तू माझ्यावर स्वतः पेक्षा कितीतरी पटीने प्रेम केलय मला तुझा जीव समजून माझी काळजी घेतलीयस.


📖✍ विलास अशोक जाधव

2 comments: