text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

माझ्याविना ती...



सर्व महिलांना समप्रित...

कोणताही मनुष्य प्राणी मेल्यावर त्याच्या मागे त्याच्यासाठी स्वतः मध्ये बदल करणार्‍या त्या पत्नीस अर्पण...


मी असलो काय नसलो काय कोणालाही फरक पडत नाही आणि फरक पडणार हि नाही अगदि तुझ्यावर देखील.


हो माहित आहे मला मी निघुन गेलो तर दोन दिवस रडुन सर्वच विसरतील.
माझ अस्तित्व संपल तर सर्वात जास्त परिणाम तुझ्यावर होईल.

 माझ्या सोबोत तुझ्या कपाळावरुन सौभाग्याच लेन कायमच निघुन जाईल.

माझ्या नावाचा हिरवा चुडा कायमचा लांब होईल.


गळ्याची शोभा वाढवणारे मंगळसूत्र कायम गळ्याची साथ सोडेल.


तुझ्या नाकात शोभुन दिसणारी मोत्याची नथ कायम तिजोरित ठेवावी लागेल.


माझ्यामुळे पायातली जोडवी अडवणूक करतात ती तुला कायमची मोकळी करतील.


मी असे पर्यंत मंगल प्रसंगात अग्रणी राहु शकतेस मात्र माझ्यानंतर सर्वांच्या शेवटी.


 हो ईतक सर्व फक्त तुझ्यासोबत घडेल. मात्र माझ्या आई ईतके माझ्यावर प्रेम नाही ग करु शकत तू.

खरंच तुझ महत्व खुप आहे,  मी देखील तुझ्या मृत्यू नंंतर ईतके बदल करु शकणार नाही म्हणुनच तू ग्रेट आहेस. आणि म्हणूनच बायकोला अर्धांगिनी म्हणतात.


आई सोबत माझी नाळ जन्मा अगोदरच जोडली गेली आहे आणि तुझ्या सोबत जन्माची... तु म्हणजे या जन्माची साक्षीदार साथीदार आहेस...

✍ विलास अशोक जाधव

No comments