text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

सारे काही स्वसंरक्षणासाठी...



आज आजु बाजू लोक तोंड लपवुन चालताना दिसतात. काही जण नाक मुठीत धरुन चालताना दिसतात. कधी कोणी स्वप्नात हि विचार केला नसेल की स्वतःवर तोंड लपवुन जगण्याची वेळ येईल. समाजात नाक मुठीत धरुन जगाव लागेल. मात्र आज स्वतःच्या रक्षणासाठी का होईनालोक तोंड लपवत आहेत. नाक मुठीत धरुन चालत आहेत. या तोंडाला लावलेल्या मास्क मुळे कोरोनो पासुन संरक्षण होईल की नाही माहित नाही. मात्र धुळी पासुन नक्की संरक्षण होईल.
मुली तोंडाला स्कार्प बांधतात म्हणुन हसणारे, शब्दांचा चिखल फेकणारे पुरुष आज मात्र मास्क आणि रुमाल बांधुन फिरताना दिसतात. ठळक लिप्सस्टीक लावुन स्वतःचा बोल्ड पणा दाखवणार्‍या मुली / महिला आज मात्र त्याच लिप्सस्टीक वर मास्क लावुन फिरतात.

📖✍ विलास अशोक जाधव

No comments