text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

ये...

ये

बिखरलोय मी , सावरायला  ये !
जमलंच तर , आधार द्यायला ये !
खुप बोलायच आहे , ऐकायला ये !
एकटाच बडबडून थकलोय , आता तरी ये !

एकांत वाटतोय , सहवास द्यायला ये !
आयुष्याच गणित सोडवतोय , उत्तरातील कमी भरण्यासाठी ये !
साथ मागतोय , आयुष्याच्या शेवटापर्यंत सोबत  द्यायला ये !
पुरे झाला भास तुझा , प्रत्यक्षात तू ये !

जीव गुदमरतोय , आॅक्सिजन बनुन  ये !
जीवनाचा अर्थ  सांगायला ये  !
जग सोडावस वाटतंय , एकदा उराशी घ्यायला ये !
मी चुकत असेन तर समजवायला ये !


📖✍विलास अशोक जाधव

7 comments: