महिला दिन की दीन
महिला दिन
आज जागतिक महिला दीन. हो माहित आहे दिन न लिहीता मी दीन लिहल आहे. कारण आज ही महिला दीनच आहेत. भारत देशाला स्वतंत्र होवुन ७२ वर्ष झाली तरी देखील महिला अजून सबला झालेल्या नाहित.
पुर्वी महिलांना गरज शिक्षणाची समानतेची होती. सध्या स्रीया शिक्षण घेवुन स्वतःच्या पायावर उभ्या राहुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन जगत आहेत,बस, ट्रेन, अगदी विमान चालवण्याच काम करत आहेत. पण आजच्या महिलांना खरी गरज आहे ती संरक्षणाची.
काही ठिकाणी ५०-६० हजार रुपये भरुन एखादा कोर्स लावला असेल आणि तिथे देखील असुरक्षितते मुळे पैशाची पर्वा नकरता मुली त्या कोर्स सोडतात. त्याला कारण फक्त महिलांना वाटणारी असुरक्षितता. सरकार महिलांना संरक्षण देवु शकत नाही सरकार कमी पडतय संरक्षण द्यायला आणि म्हणूनच आज प्रत्येक बापाच्या मनात भिती आहे ती आपली मुलगी छोटा शिशुच शिक्षण असो वा डिग्रीच शिक्षण घेत असो तिथे तिच संरक्षण कोण करेल ? याची चिंता असते, रस्त्याने एकटे चालत येण्याची भिती वाटते म्हणून School Bus ने पाटवायचा विचार केला तरी तिथे तिथले कर्मचारी अगदी महिला सुध्दा आपल्या मुलीला आपल्या घरापर्यंत सुरक्षित आणतील याची खात्री नाही. आज समाजात ३ वर्षा च्या मुली पासुन ७०-८० वर्षाची आजी सुध्दा सुरक्षित नाही. कधी कधी मनात विचार येतो मुलीला जन्म देवुन त्यानंतर तीच्यावर अन्याय अत्याचार होताना पाहण्यापेक्षा मुलीला जन्मच देवु नये. असा विचार येतो मात्र असे कोणी करु नये. त्यातूनच एखादी झाशीची राणी, कल्पना चावला, जिजामाता, सावित्रीबाई फुले जन्माला आली तर म्हणून मुलीला जन्म द्याच.
एखादा पशु ज्या प्रमाणे वागत नाही त्या प्रमाणे आज माणूस वागताना दिसतो. देशाच्या राजधानीत नको नको ते प्रकार घडतात, अगदी राजधानीतच नव्हे तर गावा गावात घडतात.
याला जबाबदार आपण सरकारला धरतो, का तर सरकार संरक्षण देवु शकत नाही, पण सरकार ईतकेच जबाबदार विरोधक आहेत. आणि तितकेच आपण आपल्या मुलांवर संस्कार करायला कमी पडतो. स्रीचा आदर करायला शिकवल पाहिजे. मान ठेवायला शिकवल पाहिजे.
कुठे दुष्काळ पडला, अत्याचार झाला, बाॅब्म स्फोट झाला की दौरे काढुन जनतेचा पैसा वाया घालवण राजकारण्यांना बरोबर जमत. जनतेची सहानभुती मिळवायची हे प्रत्येक पक्षाच नेहमी सुरुच असत. ऐंश आरामात पंचतारांकित हाॅटेल मध्ये राहुन ह्या राजकारण्यांना त्या जनतेच्या वेदना कशा समजणार.
पंचतारांकीत हाॅटेल बंगल्यान मध्ये पाणी मिळत ओ. राजकारण्यांच्या कंपन्या, कारखाने चालवायला पाणी मिळत. पण त्याच गावातील जनतेला पाणी मिळत नाही. पाणी भरण्यासाठी दुर दुर जाव लागत. पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलांवर अतिप्रसंग ओढवतो. दिड-दोन कोस अंतर चालून काय हाल होतात ते बंगल्यामधे राहुन जाणवत नाही. घरातील तरुण मुलीला पाणी आणायला घेवुन जाव की घरातील लहान बाळा जवळ ठेवाव हा प्रश्न पडतो. दोन्ही ठिकाणी धोका घरी ठेवुन गेल्यावर पाणी आणे पर्यंत २-३ तास जातात. तेवढ्या वेळात कुठे काय होईल याचा भरवसा नाही. एखादा नराधम आपली भुक भागवण्यासाठी कोणत्या धराला जाईल याचा काही नेम नाही. अशा प्रसंगाची भिती ह्या राजकारण्यांना वाटत नाही. कारण ते VIP असतात त्यांना संरक्षण असत. त्यांचे बंगले चार मजबुत भिंतीनी बंधिस्त असतात , आणि गरीब जनतेच्या घरांना धड भिंती नसतात. असल्याच छप्पर फाटलेल असत. अशा अवस्थेत जगत असता. त्यांच दुःख काय कोण जाणणार. "ज्याची जळते त्याला कळते" ओ.
मी शेवटी एवढच म्हणेन लोक प्रतिनिधींनो, समाज उपयोगी संस्थानो, मंडळांनो, आदी समाज सेवकांनो थोडी मदत करुन प्रत्येक शाळेत मुलींना मोफत कराटे शिक्षण उपलब्ध करुन द्या. त्यातुन तरी त्या महिला, मुली स्वतःच संरक्षण करतील. पुन्हा महिला दिना दिवशी "महिला दीन" म्हणण्याची वेळ येणार नाही.
??✍विलास अशोक जाधव
No comments