text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

अपेक्षांचे ओझं


अपेक्षांचे ओझंं 

भलेही शितावरुन भाताची परिक्षा करता येते. मात्र मुलांच्या एक दोन प्रश्नावरुन त्यांच्या पेपरची पातळी ठरवु नका. पेपर तयार करणारे शिक्षक काहीतरी विचार करुन पेपर तयार करत असतील ना ? ते शिक्षक आहेत त्यांना त्याच शिक्षण मिळाल असेल ना ?
मग तरीही काही पालक, मुलांचे पेपर हातात घेवुन चाळतात. राॅबट सारखे पेपरची पाने फिरवुन  पुर्ण वाचला जात नाही. मात्र तरीही पालक त्यावरुनच तो पेपर कसा होता ते ठरवतात. काही पालक तर एक - दोन प्रश्नन चुटकी सरशी वाचतात आणि त्यामुलांचा पेपर सोपा होता अस डिक्लर करतात. अस त्या मुलांना दुखी करण्यापेक्षा , त्यांना प्रोत्साहन द्या, विश्वास द्या, त्यांच्या पाठिशी कायम आहात याची जाणीव करुन द्या. ईतका अवघड पेपर तुला कसा गेला अस विचारुन बघा. त्यांच कौतुक करा. पुढच्या पेपरची तयारी जोमाने करतील.


तो पेपर वर्गातल्या काही मुलांना सोपा असेल ,पालकांना ही तो पेपर सोपा वाटत असेल. मग तो आपल्या मुलाला ही सोपाच असावा अशी अपेक्षा नको. वर्गातली बाकी मुले आणि आपला मुलगा याच्या आकलनशक्ती, बुद्धिमत्ता , आवड निवड  यामध्ये काही अंतर असेल ना ? पालक आणि पाल्य यांच्या मध्ये देखील काही अंतर असेल ना ? मग त्या मुलांचा अपमान का करायचा. तुम्हाला एखाद्या प्रश्नाच उत्तर येत असेल तर त्याला ते येईलच अस नाही.

तो देखील कोणत्यातरी कौशल्यात निपुण असेल. त्याला त्यात मार्गदर्शन करा. त्याला सकारात्मक बनवा. जीवनाकडे सकारात्मकतेने बघायला शिकवा. 


                                              ✍विलास अशोक जाधव

2 comments:

  1. Replies
    1. हो, धन्यवाद सर आपण वाचून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल

      Delete