स्त्री भ्रूण हत्या
स्त्री भ्रूण हत्या
(एका मुलीचा आत्मा आपल्या आईशी संवाद)
तू खुन केलास, तू हत्यारी आहेस, तू मला का मारलसग आई ! तुला आई कशी म्हणू ग...
मला देखील तुझ्या प्रमाणे कोणाची तरी आई व्हांयच होत, कोणाची तरी अर्धांगीनी बनायच होत, कोणाची तरी बहिण व्हायच होत, कोणाची तरी आजी बनायच होत नातवंडाना अंगा खांद्यावर खेळवायच होत. पण ते तू होवू दिल नाहिस.
मला माहित आहे ह्यात तुझा एकटीचा दोष नाही. तर ह्या समाजालाच मुलगी हे अपत्य नकोय, मुलगी म्हटल की परक्याच धन, प्रत्येकाला वंशाचा दिवाच हवा असतो, मुलगी झाली म्हणजे आई—वडिलांच्या जबाबदार्या वाढतात, चिंता, घोर वाढतो.
पण आई तू तरी स्वतः असं करण योग्य नव्हत. तू देखील स्री आहेस, तुला देखील तुझ्या आई—बापांन जन्म दिला.
माझा आत्मा घुटमळतोय मला देखील हे जग उघड्या डोळ्यांनी पहायच होत.
आज २१व्या शतकात स्री—पुरुषांना समानतेचा हक्क आहे. स्री—पुरुष खांद्याला खांदा लावुन समाजात वावरतोय पण तुझ्यात स्री—पुरुष भेदभाव का ? नपेक्षा पशु—पक्षी बरे ते वंशाचा दिवा पाहत नाही.
एक अशी अख्यायीका आहे.
वाघीन व्हायल्यानंतर ती भुकेने व्याकूळ असल्यामुळे ती आपल्या पिलांना खाते, त्यात ती वंशाचा दिवा शोधत नाही. ती भुकेमुळे पिलांना खाते पण तुला अशी कोणती भुक लागली होती ? कि तू मला खाल्लीस,मला खाल्लीस,मला खाल्लीस ...

विलास अशोक जाधव
🤞
ReplyDelete🙏🙏
DeleteNice
ReplyDeleteVery nice 👌👌
ReplyDeleteThanks
Delete