जीवन
जीवन
" भांडुपपूर नावाच एक गाव होते. त्या गावातल्या रमेश शेतकर्याच्या जीवनातली त्याच आयुष्य बदलणारी ही कथा. तो आई, बाबा, पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत राहत असे. त्याच्या लहान बहिनीच लग्न झाल होत. "
रमेशला त्याच्या आई - बाबांनी काबाड कष्ट करुन ७वी पर्यत शिक्षण दिल होत. घरात अठरा विश्व दारिद्र, त्यामुळे शिक्षणाची आवड असुन सुद्धा तो पुढे शिक्षण घेवु शकला नव्हता. रेश्मा (रमेश ची बहिण) ९वी ला असताना, त्यांच्या वडिलांना लकवा (पॅरीलिसी) झाला. त्यामुळे बाबांना शेतीची कामे जमेनाशी झाली. रमेशवर रेश्मा सोबत घराची जबाबदारी होती. तिने खुप शिकाव आपल्या आई बाबांच नाव उज्ज्वल कराव असं रमेशला वाटत होते. रेश्मा आईला घरकामात मदत करत असे. रमेश स्वतः शेतीची कामे करत होता.
रेश्माच्या शिक्षणाचा खर्च , बाबांची डाॅक्टरी त्यामुळे त्याला अधिक मेहनत घेण गरजेच होत. घरात कमवणार देखील कोणी नव्हत. घरी आईला पैशाची मदत व्हावी म्हणुन रमेशने चहाची टपरी सुरु करायच ठरवल. तो रात्री गावा बाहेर असणार्या हायवेवर (महामार्ग) जावुन चहा विकत असे. रात्री प्रवास करणारे प्रवासी चहा पिण्यासाठी येत. आजु बाजुला कोणतच हाॅटेल नव्हत त्यामुळे रमेशची चहाची टपरी खुप मस्त चालत होती आणि कमी कालावधीत प्रसिद्ध देखील झाली. रात्रभर जागरण करुन मेहनत घेवुन पैसे कमवत होता. घामाचे पैसे सकाळी घरी घेवुन येताना चेहर्यावर कोठेही थकवा नसे. रात्रभर जागरण करून ही डोळ्यावर झोप नसायची प्रवाशांची सेवा केल्याच चेहर्यावर समाधान असे. घरी देखील सर्व आनंदी होते. पैसे घरी येत होते आणि त्यामुळे बाबांची डाॅक्टरी चांगल्या डाॅक्टरकडे करता आली. काही दिवसात बाबा स्वतःच्या पायावर उभे राहु लागले , हळु हळु चालू लागले. त्यांच्यावर घेतलेल्या मेहनतीच फळ मिळाल . आता रमेश आणि रमेशचा परिवार सुखाने राहत होता. रेश्माला १०वी ला चांगले गुण मिळाले, त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी काॅलेजला अॅडमिशन देखील मिळाल. सर्व काहि आनंदाने चालू होत. त्याकाळात बाबा देखील बरे झाले. सर्व घर सुखाने समाधानाने भरल होत.
काही वर्षांनी रेश्माला स्थळ येवु लागली. त्यापैकीच एका सुशिक्षित घराण्यात तिला दिल. रेश्माचे मिस्टर इंजिनिअर होते. त्यांचा खुप सुंदर आनंदी संसार चालू होता. त्यांना दोन मुल झाली सोबतच सासु - सासरे असा सहाजणांचा परिवार गुण्या गोविंदाने राहत होता. सासु सासरे देखील सुशिक्षीत होते. काही वर्षातच रेश्मा सर्व कुटुंबा समवेत, गाव सोडुन पुण्याला स्थलांतरीत झाली.
काही वर्षांनी आईला मदत म्हणुन रमेशने लग्न कराव त्यासाठी आई बाबा त्याच्या मागे लागू लागले. त्याला पटवुन देवु लागले की त्याला कामात मदत होईल घरी आईला देखील मदत होईल. वय देखील वाढत चालल आहे योग्य वयात लग्न झालेल चांगल. इत्यादी त्याला सांगितल. आणि मग त्याच्यासाठी मुली बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला. तो काय रेश्मा सारखा जास्त शिकलेला नव्हता. ना त्याच्या जवळ सरकारी नोकरी ना खाजगी नोकरी. गरिब घरातला हा दिवसभर मेहनत करणार त्यावर तो दिवस चालनार. अशी मोलमजुरी करुन घर चालवणारा हा रमेश. हातात पैसा नाही पण ईच्छा आकांक्षा मोठ्या, स्वप्न मोठी ती पुर्ण करण्यासाठी झटायची देखील तयारी. त्याचा विवाह शेजारच्या गावातील मालती नावाच्या मुलीशी झाला. मालती देखील ७वी पास होती. शाळा सोडल्यापासून शेतीच्या कामात आई बाबांना मदत करत असे. आणी त्यामुळेच ती शेतीच्या कामात हुशार होती. मालती देखील त्याच्यासारखी मेहनती कष्टाळू. आई बाबा रमेश आणि मालती सुखाने राहत होते. कधी कोणाची कोणाविषयी तक्रार नव्हती. सर्व काही सुरळीत चालू होत. अगदि रमेशची टपरी देखील खुपच मस्त चालली होती. काही महिन्यापूर्वीच रमेशने आपल्या टपरीवर चहा सोबत वडा पाव, समोसा, भजी इत्यादी पदार्थ सुरु केले होते. आणि त्यामुळेच त्याला आर्थीक मदत देखील होत होती. आता रमेश त्या टपरीच हाॅटेल करायचा विचार करत होता. आसपास कोणतच हाॅटेल नव्हत. आणि रमेशला देखील ओळखू लागले होते. आर्थीक मदत अजुन होईल या उद्देशाने तो विचार करतो. आणि त्याप्रमाणे घरी सांगतो. घरी आई बाबा पत्नी त्यांना त्याची कल्पना आवडते ते देखील खुश होतात. रस्त्यालगत जमीन आणि हाॅटेल उभारायला लागणार साहित्य यासाठी पैसे आवश्यक होते. त्यासाठी त्याने बँकमध्ये अर्ज केला. परंतू ती सर्व प्रोसेस पुर्ण होई पर्यंत शहा नावाच्या माणसाने पैशाच्या जोरावर हाॅटेल सुरु केल. आणि त्यामुळे रमेश स्वप्न स्वप्नच राहिल. रमेशच्या टपरी वरचे प्रवासी कमी झाले. पहिल्या सारखा पैसा येत नव्हता. त्यामुळे रमेशला नैराश्य येवु लागल.
दोन वर्षांनी रमेशच्या घरी गोड बातमी समजली. रमेश बाबा होणार समजताच सर्व आनंदी झाले. आई बाबा मालतीची जास्तच काळजी घेवु लागले. रमेश पण आपला वेळ मालतीला देवु लागला. तीला कामात मदत करु लागला. मालती आणि रमेशला मुलगी झाली. मुलगी खुप सुंदर दिसत होती. त्यांनी तिच नाव रश्मी ठेवल. रमेश आपल्या मुलीसाठी शेतात विविध खेळणी बनवत असे. लाकडी वस्तू खेळणी तयार करत असे. भुक तान विसरुन आपल्या लेकीवर प्रेम करत होता. आत्या सारख म्हणजेच रमेशच्या बहिणी सारख खुप शिकाव अशी त्याची ईच्छा होती. तो त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट घेयला तयार होता.
रश्मी अभ्यासात हुशार होती. वर्गात सर्व स्पर्धामध्ये सहभागी होत असे. तिने विविध बक्षिस मिळवली होती. ती ५वी चांगल्या मार्कांनी पास झाली. वर्गात प्रथम क्रमांक आला, त्यावर्षी पुर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. अगदी जून संपत आला तरी पाउस नव्हता. शेतकर्यांनी काय कराव समजत नव्हत. पिण्यासाठी लागणार पाणि देखील जवळ नव्हत. आसपासच्या विहीरी बोअरवेल त्यात देखील पाणी नव्हत. खुप लांबुन पाणी भराव लागत असे. पाण्यामुळे प्राण्यांचे हाल होवू लागले. बिचारे मुके प्राणी मरु लागले पाण्याशिवाय. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या प्राण्यांना अस बघुन शेतकरी स्वतः आत्महत्या करु लागला. अनेक शेतकरी आपल्या परिवाराचा विचार नकरता आत्महत्या करत होते. त्या सर्व शेतकर्यासारखीच रमेशची अवस्था झाली होती. रमेश अस्वस्थ असायचा कारण घरी आई बाबा वयोवृद, रश्मीच्या शिक्षणाची जबाबदारी. आणि त्यामुळेच रमेशच्या मनात नैराश्य आल होत. आपला बाबा नेहमी सारखा नाही, हे रश्मीने ओळखल होत. नेहमी आपल्या सोबत खेळणारा सध्या वेगळा वागत होता हे जाणवत होत. रमेश रात्ररात्र जागाराहुन रडत असे. त्याला झोप लागत नसे. जीवन नकोस वाटत होत. जे हाल होत होते ते पाहवत नव्हते. असे हाल बघण्यापेक्षा मेलेल बर अस वाटु लागल. त्या रात्री रमेश खुप रडत होता स्वतःच्या जीवाला कंटाळुन दुसर्यादिवशी आत्महत्या करणार होता. जीव खुप अस्वस्थ होत होता. मध्यरात्री अचानक रश्मी उटली. तीला देखील झोप येत नव्हती. ती उठुन बाबांच्या (रमेशच्या) उशाला बसली. नाजुक हात तिने त्याच्या केसातुन फिरवला. त्याबरोबर रमेश दचकला आणि रडायचा थांबला . त्याने आपल्या लेकीचा हात ओळखला. रश्मी हात फिरवत एकटीच बोलु लागली," बाबा, काय झालंय ओ ? गेले काही दिवस तुम्ही एकटे एकटे असता . माझ्या सोबत खेळत पण नाही मी दिवसभर काय केल ?काय करते ते पण विचारत नाही, असं का ओ ? माझ काय चुकलं का ? आणि चुकलं तर मला सांगा ना . मला मारा , माझ्यावर रागवा मी तुमची मुलगी आहे . तुम्ही रागावणार नाही तर मला कोण.... पण प्लीज कधी आम्हाला सोडुन जावु नका, तुमच्याकडे बघुनच आम्ही जगतो, तुम्ही गेलात तर आम्हाला कोण आहे ? कधी मनात आम्हाला सोडुन जायचा विचार आलाच तर माझ काय होईल याचा एकदा विचार करा..." हे सर्व ऐकुन रमेश उठला आणि बोलु लागला, नाही लेकी मी नाही कोणाला सोडुन जाणार. आणि रश्मीला घट्ट मिठीत घेऊन जोरात रडु लागला ....
त्याने मनातुन आत्महतेचा विचार काढुन टाकला . आणि आपल्या कुटुंबात आनंदाने जगत आहे.
आपला___
विलास अशोक जाधव

No comments