text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

आजचा पालक

  आजचा पालक 
आज पालकांचा विश्वास स्वतःच्या मुलांवर नाही . पोटच्या मुलांपेक्षा मोबाइल , लॅपटाॅप , टॅब इत्यादी महत्वाचे वाटु लागलेत . एखाद्या  ठिकाणी मुलाला सोडतील पण चैनिच्या वस्तुची काळजी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त घेतात. मुलांच्या हक्काची जागा  आज मोबाईल, लॅपटाॅप ने घेतली आहे . पालकांच्या मांडीवर मुल नाही तर टॅब किंवा लॅपटॉप दिसतात. मुलांना शेजार्‍याकडे ठेवतील मात्र  मोबाईल किंवा लॅपटाॅप ठेवण शक्य नाही . 

आज किती पालकांना अंगाई गाता येते ? हा  संशोधनाचा विषय ठरेल. मुलांना अंगाई ऐकत झोपायची ईच्छा असते. परंतु शेवटी आई - बाबा व्यस्त असल्या मुळे मुल देखील मोबाईल वर कार्टून बघत झोपी जातात.

आपला मुलगा किंवा मुलगी कशी वागते , काय करते या विषयी आई - बाबांना माहीत असतेच असे नाही. मुल चुकीची वागली कि त्यांना तात्काळ शिक्षा केली जाते . त्या पेक्षा आपली मुल अशी का वागली याचा विचार करा , मुलांना समजुन घ्या . जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांना द्या . मुलांचे अती लाड केले किंवा गरजेपेक्षा अधिक खाऊ , खेळणी, पैसे दिले कि आदर्श पालक झालो असे काहींना वाटत ! मात्र अस करुन आपण पालकत्व सुद्धा पुर्ण करत नाही. आदर्श पालक तर सोडाच... पालक तरी व्हा...

मुलांना वेळ द्या . त्यांना बाकी नको असत. मुलांनी वेळेवर घरी बोलावल आणि आपण जाऊ शकलो नाही तर आपण त्यांना खाऊ खेळणी घेऊन जातो पण तस करु नका. पालकांची, आई - बाबांची जागा कोणतीही खेळणी किंवा कॅडबरी  घेवू शकत नाही .

काय चुक त्या निरापराध बालकाची ?
                         

आजकाल तर एका घरात एकच मूल दिसते, बिचारे ते कोणासोबत खेळणार - बागडणार ? त्याचा ही विचार आई बाबांनी करावा . पुर्वी आजी - आजोबा तरी असत .

एखाद्याला डाॅक्टर व्हायचे असेल , शिक्षक वकिल इंजिनीयर बनायचे असेल तर विविध कोर्स करुन विविध परिक्षा  द्याव्या लागतात. मात्र  आपण पालक किंवा आई - बाबा  कोणताही कोर्स न करता झालो आहोत . त्यामुळे आपण पालकत्वासाठी अशिक्षित आहोत ,  याचे भान असावे .

मुलांना स्वतंत्र रुम नको असतो , आई - बाबांच्या कुशीत झोपायच असत. आईच्या पदराखाली मोठ व्हायचं असत मात्र आज ते पहावयास मिळत नाही .

मुल कधीच चुकत नसतात त्यांच्यावर संस्कार करण्यास आपणच कमी पडत असतो .

आजची मुल म्हणजे उद्याचे भवितव्य आहे , भविष्य आहे त्यामुळे त्यांना सुजाण , सज्ञान नागरिक बनवूया !!!


सर्वच पालक असे नसतात हे ही मला मान्य आहे. मला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही... मात्र मला आजू बाजू जे दिसत ते माझ्या शब्दांत मांडले आहे. माझे विचार पटले असतील किंवा नसतील . ते प्रतिक्रिये द्वारे कळवा.

                                                                                                            ✍ विलास अशोक जाधव


3 comments:

  1. छान मांडण्याचा प्रयत्न केलाय🙏 परंतु आजचे पालक बेजबाबदारपने सुसंस्कृत पीढी घडवण्यास सक्षम नाहीत असे मला वाटते.मुलाना संस्कार देण्यास कमी पडते ही आजची पिढी! तर पालकानी आत्ता या शतकामधे तरी जागे व्हा !!👍🙏

    ReplyDelete