text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

माझी अपेक्षा

माझी अपेक्षा असते मला दुःख होवु नये ,
मात्र मी किती दुःख देतो याचाही विचार करावा !!

माझी अपेक्षा असते पुढे चालणार्‍याने मला वळून पहावे ,
मात्र मी किती मागे वळुन पाहतो !!

माझी अपेक्षा असते मला संकटाच्या वेळी मदत करावी ,
मात्र मी किती जणांना मदत करतो !!

माझी अपेक्षा असते प्रत्येकाने माझ्या मनाचा विचार करावा,
मात्र मी किती जणांच्या मनाचा विचार करतो !!

माझी अपेक्षा असते माझ्याशी सर्वांनी आपुलकीने बोलावे,
मात्र मी किती जणांशी आपुलकीने बोलतो !!

माझी अपेक्षा असते माझी कोणीतरी वाट पाहत रहावे,
मात्र मी कधी कोणासाठी थांबतो !!

माझी अपेक्षा असते माझ मत सर्वांनी ऐकुन घ्याव,
मात्र मी किती जणांची मत ऐकतो...


                                             ✍ विलास अशोक जाधव

No comments