नवा प्रयोग
आज 7 मे, मी एक वेगळा प्रयोग करायच ठरवलं.
हे माझा लहान भाऊ करतो आज मी त्याच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतः केल.
त्यातून मला काय मिळालं ते मी शब्दात नाही सांगू शकत. पण आजचा प्रयोग मला
आवडला. अजून काही दिवस असच चालू ठेवेन. तुम्हांला देखील आवडेल. मला वाटतं
सर्वांनी महिन्यातून एकदा तरी करावा असा हा प्रयोग म्हणा किंवा
कर्तव्य....
आता नेमका प्रयोग काय ते सांगतो.
मी
नेहमीच संध्याकाळी घरा बाहेर खुर्चीत बसून भावाला, काकांना, आत्यांना फोन
करत असतो. आणि त्यानंतर you tube वर काही व्हिडिओ ऐकत / बघत असतो. पण आज
मात्र मी मोबाईल मधल्या call history (कॉल हिस्टरी ) मधून फोन न लावता
Phone Book मधून फोन लावले. तेव्हा समजलं आपल्या फोन मध्ये इतके नंबर
आहेत. मी नेहमी कॉल हिस्टरी मधील त्याच त्याच नंबर ना फोन लावतो. मग मी एका बाजूने सर्वांना फोन
लावायला सुरवात केली. ज्यांना मी नेहमी कॉल करतो, पण त्यांना आज कॉल केला
नाही त्यांना माझा राग आला असेल तर सॉरी
. अजून काही दिवस असंच सहन करा.
सर्वांना
फोन लावताना खूप सारे नंबर बंद आहेत हे समजलं. D. Ed झाल्यापासून ज्या
मित्रांना शी बोलता आलं नव्हतं त्यांना आज फोन लावत होतो पण इतक्या वर्षात
त्यांनी देखील नंबर बदलले, आणि माझ्याकडे मात्र अजून जुनेच नंबर. कसे
लागणार आता ते? हेच जर मी माझ्या मित्राशी कनेक्ट राहिलो असतो तर त्यांचा
बदललेला नंबर पण मिळाला असता. माझ्या फोन ची contact लिस्ट पण अध्ययावत (
update) झाली असती. पण ज्या काही मित्रांना फोन लागला त्यांचा आवाज ऐकून
खूप बरं वाटलं. कोण कुठे आहे काय करतोय हे तरी समजलं. काही मित्रांनी
व्हाट्स ग्रुप बनवायचं सुचवलं. जेणे करून सर्वांशी कनेक्ट राहता येईल.
फक्त
D. Ed च्याच मित्रांना फोन लावला नाही तर सहकारी शिक्षक त्याच बरोबर काही
पालक विध्यार्थी त्यांना देखील फोन लावला. पालकांच्या प्रतिक्रिया खूप छान
होत्या. माझ्या काही विध्यार्थ्यांची लग्न झाली हे समजलं तेव्हा त्यांचे
शाळेतले दिवस आठवले. किती लहान होते विध्यार्थी आज इतके मोठे झाले हे
समजलं. विश्वास बसत नाही पण सत्य आहे.
अजून
खूप सारे नंबर आहेत त्यांना फोन करायचा आहे.... ज्या मित्रांचे नंबर बंद
लागतं आहेत त्यांच्याशी फेसबुक (FB) वरून त्यांचे नवीन नंबर घ्यायचे
आहेत....
शेवटी एवढंच सांगेन...
कॉल
हिस्टरी मध्ये आपण नेहमी कॉल करतो आणि आपल्याला जे कॉल येतात तेवढेच नंबर
असतात. त्याही पेक्षा कितीतरी लोक आपल्या जीवनात असतात आणि त्यांचे नंबर
देखील आपल्याकडे आहेत....
कॉल
हिस्टरी मधून बाहेर या आणि Contact लिस्ट पण बघा. आणि त्यांना फोन करा.
त्याने तुम्हांला पण आनंद वाटेल आणि समोरच्यांना सुद्धा....
✍️ विलास अशोक जाधव
Good work
ReplyDeleteMst
ReplyDeleteछान 👏✍🏻✍🏻✍🏻 प्रयोग आवडला 🙏 त्याचप्रमाणे हा प्रयोग गांभीर्याने प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे आणि आत्मसात केला पाहिजे,हा थोडंसं हसू येईल पण खरं सांगतो खूप आनंद मात्र नक्की मिळेल त्यात काही शंका नाही.🤗✍🏻✍🏻✍🏻
ReplyDeleteGood yaar nice thinking.....
ReplyDeleteGood yaar nice thinking...
ReplyDeleteNice beginning
ReplyDeleteSuperb concept... really appreciate
ReplyDeleteNice thinking....
ReplyDeleteNice thinking
ReplyDelete