text

मनातील विचार शब्द रूपात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न.
�� विलास ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. �� Welcome on Vilas Blogs. ��

अस तर होणार नाही ना ? 😱

ह्या जीवनात असंख्य छोट्या मोठ्या गोष्टी शिकायच्या आहेत  आता वेळ आहे त्या शिकता येतील, मात्र ही वेळ गेल्यावर आठवेल आणि नंतर पस्तावाल स्वतःच्या डोक्यावर हात मारुन नशिबाला दोष द्याल. आणि म्हणून आता वेळ आहे त्याचा सदुपयोग करुन घ्या.

आपण शालेय जीवनात किंवा कॉलेज मध्ये असताना result हातात घेउन जे बोलत होतो तेच बोलाव लागेल. अरे त्या वेळी थोडा अजुन अभ्यास करायला  पाहिजे होता. अजुन चांगले गुण मिळाले असते. असे आपलेच शब्द आपल्याला आठवतील . पण त्यावेळी देखील वेळ निघुन गेलेली होती आणि नंतर शहाणपण आलेल.

अगदी तसच मला वाटतं हे लॉक डाउन संपल्यावर होईल. आणि आपण खालील वाक्य म्हणाल........

  • मिळालेल्या वेळेत मी माझ्या मुलांशी मैत्री करुन सुसंवाद साधायला पाहिजे होता...
  • मिळालेल्या वेळात आई बाबांशी गप्पा मारायला पाहिजे होत्या त्यांचे अनुभव ऐकून घ्यायला पाहिजे होते....
  • मिळालेल्या वेळात बायकोला चार हिताच्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या ,तिच्या भावना समजून घेऊन तिच्या सोबत घराचं कस भविष्य उज्वल करता येईल याच नियोजन करायला पाहिजे होत...
  • बाबांशी बोलून त्यांना अजुन कसा हातभार लावता येईल याचा विचार करायला हवा होता.... 
  • लहान होऊन आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला पाहिजे होतं...
  • आईकडे अंगाई गाण्यासाठी हट्ट करायला पाहिजे होता...
  • आई कडून डोक्यावर तेल घालून घ्यायला पाहिजे होतं. अगदी लहान असताना आईने केलेल्या प्रेमळ स्पर्शाचा आनंद घ्यायला पाहिजे होता...
  • किमान एक दिवस आईला विश्रांती आणि आपली आवड म्हणून आपल्या हाताने तिच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवायला पाहिजे होता...
  • लहान होऊन भावंडांन सोबत खेळ खेळायला पाहिजे होते...
  • मोट्या भावा कडुन त्याचे कॉलेज किस्से ऐकले पाहिजे होते...
  • Whats app फेसबूक आई बाबांना देखील शिकवायला पहिजे होतं. जेणे करुन ते देखील त्यांच्या मित्र परिवारा सोबत संवाद साधू शकले असते...
  • कामाच्या व्यापात मित्र मैत्रिणीना फोन करता आला नाही त्यांना फोन, Message करायला पाहिजे होता...
  • आपले लहानपणा पासून चे शिक्षक त्यांचे  फोन नंबर शोधून त्यांच्याशी बोलयला पहिजे होतं...
  • लहानपणीच्या मित्रांचे फोन नंबर शोधून एखादा whats app ग्रुप तयार करायला पहिजे होता...
  • जुन्या आठवणी जाग्या करुन घरात "चोर-पोलीस", "मामाच पत्र हरवल" इत्यादी खेळ खेळायला पाहिजे होते...
  • आईला फेसबुक वर तिच्या वर्ग मैत्रिणी शोधून द्यायला पाहिजे होत्या  आपण आपल्या मित्र मैत्रिणीशी बोलतो तसच तिला तिच्या जुन्या मैत्रिणी भेटल्या असत्या.
  • नातेवाईकांना फोन करून विचारपूस करायला पाहिजे होती वेळ भेटला होता तर गप्पा मारायला पाहीजे होत्या...
  • सर्वांचे कागदपत्र व्यवस्थीत फाईल करुन ठेवायला पाहिजे होते...
  • नातेवाईकांना भेटणं शक्य नाही तर वीडियो कॉल करुन भेटायला हवं होत...
  • स्वतःसाठी थोडा वेळ देऊन व्यायाम करायला पाहिजे होता...
  • मिळालेल्या वेळात अक्षर सुधारायला पाहिजे होतं....
  • नविन एखादी भाषा शिकायला पाहिजे होती...
  • घरात असलेला संगणक चालू करायला पाहिजे होता...
  • MS ऑफ़िस excel वर काही तरी शिकायला पाहीजे होत...
  • लॉक डाउन मध्ये मी माझ्या इंग्रजी भाषेत सुधारणा करायला पाहिजे होती...

जगासाठी नाही तर स्वतःसाठी जगायला पाहिजे होतं...


मनासारख हसायच होत 

लहान होऊन बागडायचय होत

सारं काही राहुन गेल

हे मात्र आता  वेळ निघुन गेल्यावर कळल होत.

📖✍ विलास अशोक जाधव

6 comments: